आरोग्य हीच खरी संपत्ती -श्रीनाथ भिमाले (व्हिडिओ)
पुणे- जीवनासाठी आनंद गरजेचा आहेच पण सर्वात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर ती आरोग्य … म्हणून यंदा पुराच्या ,आणि ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवसाचा आनंदी झगमगाट टाळून भिमाले उद्यानात नागरी संवाद आणि त्यांच्या आरोग्याची विचारपूस करता करता त्याबाबत तेथेच मोफत आरोग्य शिबीर असा उपक्रम राबविला आहे अशी माहिती येथे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली . आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या भागातील नागरिकांशी भिमाले उद्यानांत थेट प्रत्यक्ष संवाद साधला.माणूस पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा तो मानसिक आणि शाररीक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.मनाची आणि शरीराची सक्षमता हि मोठी संपत्ती आहे आणि ती मिळविण्यासाठी यावेळी भिमाले आणि नागरिकांनी यावेळी एकमेकांना शुभेच्छ्या दिल्या .