तुम्हीच बनवा सॅनिटायझर,वापरा आणि विका देखील …प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे-पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने व्यावसायिकांनी ते महाग केले आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना सॅनिटायझर घेणे शक्य होत नाही.यासाठी महिलांना घरीच सॅनिटायझर बनवून वापरण्यासाठी व अल्प दारात विक्री करण्यासाठी मोफत हॅन्ड सॅनिटायझर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आबा बागुल जनसंपर्क कार्यालय शिवदर्शन करण्यात केले होते. या प्रशिक्षण शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
हॅन्ड सॅनिटायझर वापरून लहान मुले जेष्ठ नागरिक बाहेर काम करणारे सर्व महिला भगिनी आणि पुरुषांना निरोगी राहण्यास मदत होईल व त्याच बरोबर लघु उदयोग चालू करण्यास देखील चालना मिळेल करणाऱ्या असा विश्वास आहे. असे अमित बागुल म्हणाले
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची होणारी लूट यावर महिलांनी घरामध्ये तयार केलेले सॅनिटायझेर अल्प दारात नागरिकांना मिळेल व महिलांना रोजगारही उपलब्ध होईल. या हेतूने मोफत हॅन्ड सॅनिटायझर बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असे अमित बागुल म्हणाले या प्रसंगी नाईक मॅडम , सोनाली मॅडम, अश्विनी शेटे, ज्योती अरवींन, शुभांगी चव्हाण , सागर आरोळे, धनंजय कांबळे, इमात्यज तांबोळी, संतोष पवार, धनंजय कांबळे, संतोष गेले, विश्वास दिघे, बाबासाहेब पोळके, अभिषेक बागुल आदी उपस्थित होते