पुणे-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल भाजपचे माजी केंद्रिय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी स्वातंत्र्य
चळवळ ही ड्रामा होती त्यामुळे त्यांना महात्मा का म्हणायचं ? असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुणे
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथे
जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘आतंरराष्ट्रीय ख्यातीचे अहिंसावादी राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीस ड्रामा संबोधणाऱ्या अनंतकुमार हेगडे यांचा मी जाहिर निषेध
करतो. आतंरराष्ट्रीय ख्यातीचे नेते नेल्सन मंडेला, बराक ओबामा आणि मार्टिन ल्यूथर किंग यांनी ज्यांचा
आदर्श घेऊन स्वातंत्र्याचा लढा लढला अशा थोर व्यक्तीस नावे ठेऊन भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रिय
मंत्री या देशामध्ये महात्मा गांधीजींचे नाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता
अनंतकुमार हेगडेंचे नेतेच या देशामध्ये व आतंरराष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधीजींच्या पाऊलावर पाऊल
ठेवून चालतोय असे दाखविण्याचा ड्रामा करतात आणि त्यांचा खूनी नथुराम गोडसे याचे स्मारक आणि
पुतळे उभारणाऱ्यांवर कारवाई देखील करीत नाहीत. भारतीय जनता पार्टी व संघ परिवार या देशामध्ये
जातीयवाद निर्माण करून महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्व धुळीस मिळविण्याचे काम करीत आहेत. मनुवादी
वृत्ती या देशामध्ये हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु महात्मा गांधींच्या अहिसेंच्या मार्गाने
या देशामध्ये स्वातंत्र्य मिळविण्याचे काम काँग्रेंस पक्षाने केले असून ते टिकविण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर
येऊन आंदोलन देखील करेल.’’
यावेळी प्रदेश प्रतिनिधी नीता रजपूत, संगीता तिवारी यांची भाषणे झाली. सदर प्रसंगी
कमल व्यवहारे, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, नारायण पाटोळे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश
सकट, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, राजेंद्र भुतडा, शेखर कपोते, नितीन परतानी, डॉ. अनिस खान, राजेंद्र
नखाते, सुरेखा खंडागळे, शिलार रतनगिरी, साहिल केदारी, भुषण रानभरे, रवि पाटोळे, राजू शेख, प्रकाश
आरणे, देविदास लोणकर, सुरेश चौधरी, ज्योती परदेशी, संगीता शिरसागर, ज्योती अरवेन, रजिया बल्लारी,
दिपक रामणानी, बाबा नायडू, अरूण गायकवाड, नरसिंह आंदोली, मुनोतताई, बळीराम थोरात, अरविंद
रोकडे, संजय खडसे, योगेश बोर्डे, विशाल वाघेला, रमाकांत साठे आदी उपस्थित होते.