पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड रिसर्च व अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालय पर्वती, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत आणि सक्षम युवा समर्थ भारत’ अभियाना अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर मु.पो. आंबेड ता. वेल्हे येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. एन. बी. पासलकर माजी संचालक, तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते व प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, डॉ. राजेंद्र कोळी, श्री नारायण जागडे माजी चेअरमन विकास सोसायटी आंबेड, श्री भगवान पासलकर माजी संचालक, दुध उत्पादक संघ मर्यादित कात्रज, श्री काशिनाथ जागडे माजी उपसरपंच आंबेड व विद्यार्थी विकास अधिकारी, सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी डॉ. पासलकर यांनी राष्ट्र्निर्मितीमध्ये युवकांचे योगदान महत्वाचे असते, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्यांच्या विकास होऊन ते कर्तव्यतत्पर होतात तर श्रमदानामुळे खेडी, गावे कृतीशील होतात त्यामुळे अशा शिबिरांची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन डॉ. एन बी पासलकर माजी संचालक, तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी केले. सदर सात दिवस सुरु असलेल्या श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत स्वयंसेवकानी मौजे आंबेड येथील शाळा, मंदिराचा परिसर, अंतर्गत रस्ते झाडून स्वच्छ केले, पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारा बांधला, त्याच प्रमाणे महिला सबलीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, प्लास्टिक मुक्त शिवार, ग्राम सर्वेक्षण, घन कचरा व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान या सारख्या विविध विषयावर प्रभात फेऱ्या व पथनाट्य या सारखे विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधन केले. सदर शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल लोहार व प्रा.वैभव घोडके यांनी केले. आंबेड गावचे ग्रामस्त श्री. निलेश पासलकर, श्री समीर जागडे यांनी गावामध्ये शिबिराचे आयोजन केल्याबद्दल दोन्ही महाविद्यालयाचे आभार मानले.