पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अहमदाबाद ला नुकतीच भेट दिली. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना उपग्रह प्रक्षेपण या, भू निरीक्षण व दळणवळण उपग्रह, इन्सॅट उपग्रहमालिका, ग्रामसॅट व एज्यूसॅट प्रकल्प याचे कार्य कशाप्रकारे चालते. पी.एस. एल. व्ही. चे कार्य कशाप्रकारे चालते, यानाची बांधणी, प्रक्षेपण कार्य, संपर्क यंत्रणा यामध्ये रिमोट सेन्सिंगचा केला जाणारा वापर, क्षेत्रिय सॅटेलाईट नॅव्हीगेशनल प्रणाली या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे केला जातो याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.या अभ्यास सहलीचे आयोजन प्रा.गणेश कोंढाळकर यांनी केले. तर या अभ्यास सहलीमध्ये प्रा.संदीप राऊत,प्रा.दत्तात्रय कांबळे,डॉ. बालाजी सेलूलकर, प्रा.मनोज मुळीक,प्रा.कमलेश जेठा,प्रा.स्नेहल वीर,प्रा.धनश्री जोशी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभ्यास सहलीसाठी संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.