पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयामध्ये ‘फिट इंडिया’ अभियाना अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार श्री. विजयसिंह जेधे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांच्या शुभ हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. ठाकरे यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक कष्ट अतिशय कमी झाले आहे. सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे युग असून या युगात आपल्या देशाला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी शारीरिक ब मानसिक दृष्ट्या सक्षम नागरिक तयार झाले पाहिजे.मैदानी खेळामुळे शारीरिक क्षमतेबरोबर व्यक्तीतील खिलाडु वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आदी महत्वाच्या गुणांचा विकास होतो. त्याचा फायदा त्या व्यक्तीबरोबरच देशाच्या विकासासाठीही होतो. त्यामुळे जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.या महोत्सवामध्ये फुटबॉल, क्रिकेट, कब्बडी, थ्रो बॉल, रस्सीखेच, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, गोळाफेक, हॉलीबॉल, रनिंग, रिंग टेनिस या सारख्या विविध क्रीडाप्रकारामध्ये विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सदर क्रीडा महोत्सवासाठी संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक प्रा. नवनाथ सरोदे यांनी केले.