भारतातील पहिली मिड-साइझ स्कूटर दाखल करून प्रीमिअम स्कूटरायझेशनमध्ये कंपनी ठरली प्रवर्तक
नवी दिल्ली-होंडाच्या उतपादनांमध्ये आणखी वाढ करत आणि भारतातील प्रीमिअम मिड-साइझ स्कूटर श्रेणीमध्ये प्रवर्तक ठरत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने फोर्झा 300 या प्रमुख स्कूटरचा पहिला लॉट डेलिव्हर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, फोर्झा 300 ही होंडाची विश्वासार्हता व तंत्रज्ञानातील आघाडी अंगिकारत, तसेच मोबिलिटी, स्टाइल व कामगिरी यांची सांगड घालत तयार केलेली भारतातील पहिली प्रीमिअम मिड-साइझ स्कूटर आहे.
याविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मिनोरु कातो यांनी सांगितले, “होंडाची नवनवीन मॉडेलसाठी जगभर ख्याती आहे. फोर्झा 300 दाखल करून स्कूटरायझेशनची चळवळ पुढील स्तरावर नेताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आहे. यामुळे होंडा मिड-साइझ स्कूटर श्रेणीतील प्रवर्तक ठरणार आहे, शिवाय लक्झरी व राइड करण्याचा आनंद अपेक्षित असणाऱ्या ग्राहकांना नवा पैलू व नवी सेवा देण्यासाठी आम्हाला मदतही होणार आहे.”
आणखी माहिती देताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले, “गुरूग्राममधील होंडा बिगविंगमध्ये दर्शवलेल्या फोर्झा 300 ला ग्राहकांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादामुळे (ज्या प्रि-बुक होत्या) उत्तेजन मिळालेल्या होंडाने भारतात ही स्कूटर दाखल करायचे ठरवले. आम्ही ग्राहकांना 4 युनिटचा पहिला लॉट सुपुर्द केल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आगामी काळात, आर्थिक वर्ष 2021 मध्ये आम्ही युरो 5 कम्प्लायंट व्हर्जन जाहीर करणार आहोत.
दर्जेदार कामगिरी
होंडा फोर्झा 300 ला 279cc, लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड SOHC फोर-व्हॉल्व्ह इंजिनाचे बळ असून ते 24.8 bhp @ 7000rpm ऊर्जा देते. यामुळे, उत्तम फ्युएल इकॉनॉमीबरोबरच, कमी, मध्यम व उच्च rpm वर आकर्षक राइड करता येते.
टिकाऊ ठरावे अशा प्रकारे तयार केलेले व सिद्ध झालेले इंजिन रोलर टाइप रॉकर आर्म, प्लेन जर्नल क्रँक बेअरिंग्स व सील्ड क्रँकनेस यामुळे दीर्घकालीन विश्वासार्हता देते. 1.7-लिटर तेलाची क्षमता व 5mm ऑफसेट सिलिंडर यामुळे लोअर इंटर्नल फ्रिक्शन साधले जाते. बेल्ट फायनल ड्राइव्हसह ऑटोमॅटिक सेंट्रिफ्युगल क्लट व्ही-मॅटिक ट्रान्समिशन (फास्टलो स्पीड रिअॅक्शन व स्मार्ट अॅक्सिलरेशन यासाठी रेश्यो निश्चित केले जातात) देतो.
होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) – फोर्झा 300 ही एचएसटीसी असणारी होंडाची पहिली स्कूटर आहे. एचएसटीसीमुळे पुढच्या व मागच्या चाकाच्या वेगातील फरक ओळखून, स्लिप रेश्यो काढून व फ्युएल इंजेक्शनद्वारे इंजिन टॉर्क नियंत्रित करून रिअर व्हील ट्रॅक्शन पुन्हा मिळवण्यासाठी मदत होते. एचएसटीसी स्विचेबल आहे आणि ही व्यवस्था कार्यरत असते तेव्हा डिजिटल डिस्प्लेवरील ‘T’ इंडिकेटर लागतो.
दर्जेदार प्लॅटफॉर्म
1510mm शॉरट व्हीलबेस असणारी ट्युबलर स्टील फ्रेम हा चासिसचा पाया आहे. जास्तीत जास्त केंद्रीयीकरणावर भर देत, रेडिएटर व बॅटरी इंधन टाकी व सीटखालील स्टोअरेज यामध्ये बसवली आहे. फोर्झा 300 च्या आटोपशीर डायमेन्शनमुळे ती मोठ्या वाहतूककोंडीतूनही सहजपणे चालवता येऊ शकते. दणकट 33mm टेलिस्कोपिक फोर्क्स हे सिंगल पिस अॅल्युमिनिअम स्विंग आर्मद्वारे काम करणाऱ्या 7-स्टेप अॅडजस्टेबल ट्विन रिअर शॉक अॅब्झॉर्बर्सशी जुळवलेले आहेत. कास्ट अॅल्युमिनिअम 15-इंच फ्रंट व्हील व 14 इंच रिअर टायर यामुळे जास्तीत जास्त ट्रॅक्शन निर्माण होते आणि राइड करताना आरामदायीपणा मिळतो. निसरड्या रस्त्यांवर ब्रेकवर नियंत्रण मिळवण्यासाठी ड्युएल-चॅनल एबीएससह, सिंगल 256mm डिस्क ब्रेक अपन फ्रंट व 240mm रिअर डिस्क ब्रेक हे मॅक्सी-स्कूटरचे वैशिष्ट्य आहे.
दर्जेदार इक्विपमेंट व स्टायलिंग
फोर्झा 300च्या डिझाइन लाइन नव्या इलेक्ट्रिक स्क्रीनपासून तयार झाल्या असून, त्या 140mm मध्ये सुरळित सामावल्या आहेत. त्यांची रचना वाऱ्यापासून संरक्षण करण्याच्या आणि वाऱ्याचा आवाज कमी करण्याच्या दृष्टीने केली आहे. उच्च वेगात असतानाही आणि लांब पल्ल्याच्या प्रवासातही स्थिरता व आरामदायीपणा मिळतो.
सीटच्या खाली दोन मोठी हेल्मेट ठेवता येऊ शकतात. हेल्मेट आणि/किंवा रेन गिअर व A4 आकाराची बॅग ठेवण्यासाठी स्टोअरजची जागा विभागताही येऊ शकते. फ्रंट लेफ्ट इनर फेअरिंग पॉकेटला कुलुप लावता येऊ शकते आणि आतील जागा रायडरच्या सोयीनुसार वापरता येऊ शकते. त्यामध्ये 12V चार्जिंग सॉकेटही आहे.
फोर्झा 300 मध्ये स्मार्ट की आहे. की फॉब पॉकेटेडमुळे रायडरला मुख्य इग्निशन स्विच नॉब सहजपणे नियंत्रित करता येऊ शकतो, फ्युएल लिड वापरता येऊ शकते आणि सीटखालील स्टोअरेजचा वापर करता येऊ शकतो.
इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये अॅनालॉग स्पीडोमीटर व रेव्ह-काउंटर डायल्स आहे, तसेच ओडोमीटर (3 मोड), रेंज, करंट मायलेज, ट्रिप मीटर, सरासरी मायलेज व घड्याळ, आजूबाजूचे तापमान, थर्मोमीटर व बॅटरी सेन्स अशी माहिती देणारा डिजिटल सिस्प्ले आहे. स्टाइल व एअरोडायनॅमिक कार्यक्षमता या दृष्टीने तयार केलेल्या फोर्झा 300 मध्ये आधुनिक लाइन्स असून त्यामुळे खऱ्या अर्थी स्पोर्टिनेस व स्वातंत्र्य दिसून येते. पूर्णतः नवे स्टायलिंग हे शार्पर, अधिक डायनॅमिक आहे, आटोपशीर डायमेन्शनमुळे निर्माण होणारी तत्परता व कामगिरी यांना साजेसे आहे. नोझ, फ्रंट व साइड काउल्स याभोवतीच्या सिव्हर अॅसेंट्समुळे स्कूटरची एकंदर ऐट कायम राखत तिचा रूबाबदारपणा वाढतो.