पुणे: आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड खेळाडू व 23 वेळा वर्ल्ड बिलिअर्ड चॅम्पिअन असलेले पद्मभूषण पंकज अडवाणी यांनी विंडरमेअर या पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू ठिकाणी वसलेल्या व व्हॅस्कॉनच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्झरी प्रकल्पातील क्लब हाउस व स्पोर्टिंग अॅरेनाचे उद्घाटन केले. व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चे अध्यक्ष आर. वासुदेवन; बिलिअर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (बीएसएएम) अध्यक्ष राजन खिन्वसरा, व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
गेली काही वर्षे या खेळाच्या प्रसारासाठी दिलेले उल्लेखनीय योगदान व समर्पितपणे केलेले प्रयत्न यांची दखल घेऊन, आर. वासुदेवन यांनी बीएसएएमचे अध्यक्ष राजन खिन्वसरा यांचा सन्मान केल्याने हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरला.
या वेळी बोलताना व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चे अध्यत्र आर. वासुदेवन यांनी सांगितले, “राजन यांना या खेळाप्रती प्रचंड प्रेम असल्याने त्यांनी स्वयंप्रेरणेने या खेळाच्या विकासासाठी योगदान दिले. गेल्या काही वर्षांत, ते या खेळाला सातत्याने पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे पुण्यामध्ये अशा अनेक प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दीर्घ कालावधीपासून त्यांच्या कार्याची दखल घ्यायची होती. खेळाबद्दलची त्यांची पॅशन वर्षागणिक वाढत असल्याचे दिसते आहे.”
बिलिअर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (बीएसएएम) अध्यक्ष राजन खिन्वसरा यांनी सांगितले, “या सन्मानाबद्दल मी अतिशय ऋणी आहे. हा सनमान म्हणजे तुम्हा सर्वांचे प्रेम आहे. या खेळासाठी आणखी बरेच काम करायचे आहे. मी अखंडपणे काम करत राहणार आहे आणि या खेळाला पाठिंबा देण्यासाठी आणखी अनेक जण पुढे येतील, अशी अपेक्षा आहे.”
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, “ विंडरमेअरचे क्लब हाउस व स्पोर्ट्स अॅरेना यांचे उद्घाटन करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल आम्ही पंकज अडवाणी यांचे आभारी आहोत. विंडरमेअर लक्झरीला नवी परिभाषा देते आणि आपल्या रहिवाशांना सोफिस्टिकेटेड, उच्चभ्रू व या श्रेणीतील सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करते. दिली आहे.”
पंकज अडवाणी हे बिलिअर्ड व स्नूकर टेबलवर ओपनिंग शॉट खेळले आणि त्यांनी काही अप्रतिम शॉट खेळून उपस्थितांना चकित केले. अडवाणी स्पोर्ट्स अॅरेनामध्ये टेनिसही खेळले.