पुणे: फिक्की एफएलओ पुणे चॅप्टरने आपल्या पाचवा वर्धापनदिनानिमित्त व्होकेशनल अवॉर्ड्स ‘स्किल अँड एन्त्रेप्रेनेऊरशिप‘ चे आयोजन केले होते. आजवर अनुल्लेखित राहिलेल्या प्रतिभावान, निपुण महिलांचा सन्मान करण्यासाठी हे विशेष पुरस्कार देण्यात आले. पुण्यातील ताज ब्ल्यू डायमंड येथे हा शानदार समारंभ पार पडला. प्रमुख पाहुणे राज्याचे माननीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक, सन्माननीय अतिथी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे डायरेक्टर जनरल श्री. राजेंद्र जगदाळे आणि एफएलओ चॅप्टर पुणेच्या चेअरपर्सन श्रीमती रितू प्रकाश छाब्रिया यांच्या हस्ते विविध सरकारी विभागातील गुणवंत महिलांना तसेच एफएलओ सदस्यांना स्पेशल कॅटेगरी चेअरपर्सन्स अवॉर्डने सन्मानित केले.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुण्यातील खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या चार पॅराप्लेजिक वीरांनी आपली कौशल्ये प्रदर्शित करून सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि अभिमान निर्माण केला.सरकारी रुग्णालय, डाक विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, रेल्वे, पोलीस, पशुपालन या क्षेत्रातील गुणवान आणि परिश्रमी महिला कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुणे माननीय मंत्री श्री. नवाब मलिक व संबंधित विभाग प्रमुखांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी फिक्की एफएलओ पुणे चॅप्टरच्या चेअरपर्सन श्रीमती रितू छाब्रिया यांनी सांगितले, “यंदा आम्ही आमच्या पुणे चॅप्टरचा पाचवा वर्धापनदिन साजरा करत आहोत आणि या निमित्ताने आमच्या शहरातील आजवर अनुल्लेखित राहिलेल्या महिलांच्या गुणांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि यावेळी मी माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानते. भविष्यातही आमचे हे कार्य सुरु राहील, समाजाच्या सर्व स्तरातील महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी संधी पुरवत राहू.” महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचानालयाचे अतिरिक्त सह संचालक डॉ. अजय चंदनवाले आणि दक्षिण महाराष्ट्र; डॉ डी डी परकाले, जॉईंट कमिशनर ऑफ ऍनिमल हसबँडरी गोवा उप क्षेत्राचे मेजर जनरल नवनीत कुमार हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे इतर विविध सरकारी विभागांचे प्रमुख देखील उपस्थित होते.
फिक्की एफएलओ पुणे चॅप्टर:
फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन – एफएलओ, पुणे चॅप्टर ही फिक्कीची महिला संघटना आहे. महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार १९२७ साली फिक्कीची स्थापना करण्यात आली. एफएलओ हा महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवर चालवण्यात येणारा फोरम असून त्यांचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. देशभरात १५ ठिकाणी कार्यरत असलेले एफएलओ ६००० पेक्षा जास्त महिला उद्योजिका व व्यावसायिकांचे प्रातिनिधीत्व करते. ३३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले एफएलओ महिलांमध्ये उद्योजकतेला आणि व्यावसायिक सर्वोत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यशाळा, परिसंवाद, परिषदा, व्याख्याने, प्रशिक्षण वर्ग आणि क्षमता निर्माण कार्यक्रमांचे आयोजन करते. सर्व उद्योगक्षेत्रातील आणि सर्व आर्थिक स्तरातील महिलांची कौशल्ये, ऊर्जांना प्रोत्साहन देण्याचे काम एफएलओ करते.
चॅप्टरमध्ये सध्या ४६५ महिला सदस्य आहेत.