बँकेच्या 7.8 दशलक्ष ग्राहकांना जीवन विमा उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी भागिदारी
मुंबई – भारताच्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आरबीएल बँक आणि भारतातील आघाडीच्या विमा कंपन्यांपैकी एक बजाज अलियान्झ लाइफ यांच्यात बँकेच्या ग्राहकांना जीवन विमा उत्पादन पुरवण्यासाठी धोरणात्मक भागिदारी करण्यात आली आहे. या भागिदारीनुसार बजाज अलियान्झ लाइफ, बँकेच्या ग्राहकांना सर्व प्रकारची रिटेल उत्पादने उपलब्ध करून देणार असून त्यात टर्म, बचत, निवृत्ती आणि गुंतवणूक उत्पादनांचा समावेश असेल. या उत्पादनामुळे बँकेच्या ग्राहकांना त्यांची जीवनध्येये साध्य करण्यास मदत होईल. आज मुंबईत दोन्ही संस्थांमध्ये कॉर्पोरेट एजन्सी करारावर सह्या करण्यात आल्या.
या भागिदारीअंतर्गत आरबीएल बँक ग्राहकांना जीवन विमा उत्पादने मिळवून देण्यासाठी आपल्या आर्थिक सेवांचा पोर्टफोलिओ विस्तारणार आहे. बजाज अलियान्झ लाइफ आपल्या अत्याधुनिक जीवन विमा उत्पादनांच्या मदतीने बँकेच्या नव्या आणि सद्य ग्राहकांना जीवन विम्याचे फायदे मिळवून देत सक्षम करेल. आरबीएल बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन विमा योजना बँकेच्या 1616 कार्यालयांतून (372 शाखा आणि 1245 बीसी शाखा) घेता येतील.
या भागिदारीविषयी बजाज अलियान्झ लाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरुण चौघ म्हणाले, ‘आरबीएल्चाय विस्तृत ग्राहकवर्गाला जीवन विम्याचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मला खात्री वाटते, की खास तयार करण्यात आलेली आमची विमा उत्पादने आणि ग्राहकाभिमुख डिजिटल सेवा ग्राहकांचा एकंदर अनुभव उंचावतील, शिवाय आमची भागिदारी मजबूत होण्यासाठीही त्याचा फायदा होईल. ’
आरबीएल बँकेच्या रिटेल लायबिलीटीज आणि संपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख सुरिंदर चावला म्हणाल्या, ‘ग्राहकांना विविध प्रकारची आर्थिक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी या भागिदारीअंतर्गत आमची बलस्थाने एकत्र करण्यात आली आहेत. बजाज अलियान्झ लाइफची नाविन्यपूर्ण जीवन विमा उत्पादने आमच्या ग्राहकांना अधिक सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी आवश्यक नियोजन करण्यास मदत करतील.’