अहमदाबाद: मर्सिडिज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादकाने आज ‘फास्ट लेन बॉडी अँड पेंट रिपेअर’ हा वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण सेवा उपक्रम दाखल केला आहे. गाडीचा मालकांना उत्कृष्ट अनुभव मिळावा व त्यामुळे लक्झरी कार श्रेणीतील कंपनीचे वेगळेपण अधोरेखित व्हावे, हा या ग्राहक-केंद्री सेवा उपक्रमाचा हेतू आहे. ‘फास्ट लेन बॉडी अँड पेंट रिपेअर’मुळे ग्राहकांना अपघातविषयक विशिष्ट दुरुस्तीचे काम 3 दिवसांमध्ये करून दिले जाणार आहे. कार्यक्षम प्रक्रिया वापरणे, डाउनटाइम कमी करणे व वेगाने सुकणारे कम्पोनंट वापरणे, तसेच दुरुस्तीच्या गुणवत्तेबाबत जराही तडजोड न करणे याद्वारे हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना गाडीचे झालेले नुकसान लवकर दुरुस्त करून मिळणार आहे व त्यामुळे यांना लवकरात लवकर गाडी पुन्हा वापरता येईल, वाहतुकीची सोय होईल आणि ग्राहकांची गैरसोय टाळता येईल. याबरोबरच, ग्राहकांना इन्शुरन्स रिपेअर कामासाठी या सेवेचा लाभ घेता येईल.
मर्सिडिज-बेंझ इंडियाचे कस्टमर सर्व्हिसेस व कॉर्पोरेट अफेअर्स उपाध्यक्ष शेखर भिडे यांनी नमूद केले, “लक्झरी कार श्रेणीतील आघाडीची कंपनी म्हणून लक्झरी कार मार्केटचा विस्तार करणे, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. भारतातील आमच्या विस्ताराच्या धोरणामध्ये ग्राहक सेवा हा घटक महत्त्वाचा आहे. भारतातील लक्झरी ऑटोमोटिव्ह श्रेणीतील ग्राहकांना उत्कृष्ट व अविस्मरणीय सेवा देण्यासाठी मर्सिडिज-बेंझ अतिशय उत्सुक आहे. ‘फास्ट लेन बॉडी अँड पेंट रिपेअर’ दाखल करणे हे या दिशेने टाकलेले पाऊल आहे. प्रामुख्याने अपघाताच्या बाबतीत टर्नअराउंड टाइम हा सर्वाधिक असतो आणि तो तणावपूर्ण असू शकतो. अशा आव्हानात्मक कालावधीत झटपट व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून आम्हाला ग्राहकांना मदत करायची आहे. या उपक्रमामुळे, आम्ही गेल्या दशकभर संपादित केलेला ग्राहकांचा विश्वास आणखी गहिरा करणे आम्हाला शक्य होणार आहे.”
बेंचमार्क कार्सचे समूह अध्यक्ष संजय ठक्कर यांनी सांगितले, “या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. विशेषतः लक्झरी कार श्रेणीच्या बाबतीत ग्राहक सेवा कंपनीचे वेगळेपण अधोरेखित करते. ग्राहकांनी ब्रँडवर दाखवलेला विश्वास विचारात घेता त्यांना सर्वोत्तम सेवा मिळावी, याची दक्षता आम्हाला घ्यायची आहे. अशा उपक्रमांमुळे ग्राहकांच्या आमच्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मदत होते आणि त्यांचा ब्रँडच्या बाबतीत आत्मविश्वासही वाढतो.”
ही सेवा आता अहमदाबाद, मुंबई व पुणे येथे उपलब्ध आहे आणि 2020 मध्ये आणखी 7 शहरांत सुरू केली जाणार आहे.