मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या 20.7 अब्ज डॉलरच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने स्कॉर्पिओ या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेलचा सहयोग दबंग 3 या सलमान खानची भूमिका असणाऱ्या आगामी सिनेमाबरोबर केला असल्याचे आज जाहीर केले आहे. दणकटपणासाठी व मजबूतपणासाठी नावाजलेली स्कॉर्पिओ ही डिसेंबर 20, 2019 रोजी चित्रपटगृहात झळकणार असणाऱ्या दबंग 3 मधील सलमान खानच्या व्यक्तिमत्त्वासाठी आदर्श पार्टनर आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ 17 वर्षांपूर्वी एसयूव्ही श्रेणीला नवे आयाम दिले आणि आजही हे वाहन या श्रेणीमध्ये प्रभुत्व गाजवत आहे. 6.5 लाख ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने या उत्पादनामध्ये सातत्याने बदल केले जातात. गेल्या काही वर्षांत, स्कॉर्पिओने भारतातील विविध यशस्वी चित्रपटांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले आहे आणि दबंग 3 बरोबरचा सहभाग हे या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. शक्ती, थरार व साहस यांचा मूलभूत डीएनए असणारी स्कॉर्पिओ या सिनेमासाठी आदर्श आहे.
या सहयोगाविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मार्केटिंगचे उपाध्यक्ष विक्रम गर्ग यांनी सांगितले, “2002 मध्ये दाखल करण्यात आलेल्या स्कॉर्पिओने पूर्णतः नवे पैलू सादर केले आणि तेव्हापासून या उत्पादनाने एसयूव्ही श्रेणीवर वर्चस्व गाजवले आहे. शक्तिशाली व आकर्षक असण्याच्या ब्रँडच्या मूल्याच्या अनुषंगाने, महिंद्रा स्कॉर्पिओ हा वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड ग्राहकांना राईजसाठी प्रोत्साहन देतो आणि योग्य अर्थी ताकद दाखवण्यासाठी मदत करतो. ही वैशिष्ट्ये चित्रपटातील नायकाशी मिळतीजुळती आहेत व त्यामुळेच हा सहयोग आदर्श आहे.”
ऑन-स्क्रीन सहभागाबरोबरच, महिंद्राचा ‘दबंग 3’बरोबरचा सहयोग स्वाभाविकपणे ऑफ-स्क्रीनही असणार आहे. त्यामध्ये, विविध माध्यमांद्वारे निरनिराळे उपक्रम आयोजित केले जातील. ग्राहकांना सहभागी करून घेतले जाईल.