एकाच वेळी 14 राज्यांमध्ये 355 हून अधिक ठिकाणी, 500 हून अधिक खेड्यांमध्ये पशुविकास दिन साजरा
मुंबई: आपल्या लोकसंख्येचे मोठे प्रमाण दैनंदिन उत्पन्नासाठी पशुपालनावर अवलंबून आहे. या नागरिकांमध्ये पशुपालनाविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी व त्यांच्या पशुधनाला वैद्यकीय सहाय्य मिळवून देण्यासाठी फुलरटन इंडिया या कंपनीने पशुविकास दिनाचे नुकतेच आयोजन केले होते. भारतातील अग्रगण्य अशी बॅंकेतर वित्तसंस्था असणाऱ्या ‘फुलरटन इंडिया’ने हा उपक्रम चौथ्या वर्षी आयोजित केला. 14 राज्यांमधील 350 हून अधिक ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ 500 हून अधिक गावांना झाला. या उपक्रमात 68 हजार गुरांवर उपचार करण्यात आले. त्यांच्या 21 हजारांहून अधिक मालकांना याचा लाभ झाला.
गेल्या चार वर्षांत पशुविकास दिनी सुमार दोन लाख पशुंची चीकित्सा करण्यात आलेली आहे व या उपक्रमाचा लाभ 50 हजारांहून अधिक पशुपालकांनी घेतलेला आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना ‘फुलरटन इंडिया’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका राजश्री नंबियार म्हणाल्या, “आर्थिक लाभांपासून वंचित राहणाऱ्या समाजाच्या प्रश्नांची जाण ठेवून आम्ही आमचा व्यवसाय करीत आहोत. म्हणूनच, आमच्या विकास कार्यक्रमांचा एक मोठा भाग ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्पन्नवाढीवर केंद्रित झालेला आहे. या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नास चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न असतात. दुर्गम भागात राहणाऱ्या या लोकांसाठी पशुधन महत्वाचे असते. या पशुधनाविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याची काळजी घेऊन शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने पशुविकास दिवस सुरू करण्यात आला आहे.”
पशुविकास दिनावर भाष्य करताना, ‘फुलरटन इंडिया’च्या’ मार्केटिंग अँड क्रॉस सेल’ विभागाच्या सरव्यवस्थापिका शिल्पा देसाई म्हणाल्या, “आम्ही हा कार्यक्रम 2014 मध्ये सुरू केला. त्यास अजूनही उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद मिळत आहे. पशुविकास दिनी आम्ही पशुंच्या आरोग्याविषयीचे शिबिर देशातील अनेक भागांमध्ये आयोजित करतो. आमचे कर्मचारी ग्रामीण समुदायाशी संपर्क साधतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात. आमच्या प्रयत्नांना स्थानिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून आम्ही या समाजाला जोडून घेतले आहे व त्यास मदत करण्याचे हेतू साध्य होत आहेत.”
‘फुलरटन इंडिया’च्या देशव्यापी पशुविकास दिनाच्या यंदाच्या कार्यक्रमातही अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर सहभागी झाले होते. त्यांनी पशुपालकांना उत्पादकता वाढविणे, बाजारपेठेत चांगले संबंध निर्माण करणे आणि गुरांची चांगली काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले. गुरांची मोफत तपासणी करून त्यांनी औषधे आणि लसीकरणाबद्दल पशुपालकांना चार गोष्टी शिकवल्या. पशुविकास दिन साजरा करण्यास 22 नोव्हेंबर 2014 मध्ये सुरूवात झाली आणि त्यानंतर 2015 व 2018 मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भारतभर आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुआरोग्य शिबिरांचे कौतुक 2015 मध्ये ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदविण्यात आले आहे. तसेच 2018 मध्ये जगातील सर्वात मोठे एकदिवसीय पशुआरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ येथेही विक्रम नोंदविण्यात आला आहे.
‘फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड’बद्दलः
फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (एफआयसीसीएल) या बॅंकेतर वित्त कंपनीची स्थापना 2007 मध्ये झाली. शहरी आणि ग्रामीण कुटुंबांना, तसेच लघु व मध्यम उद्योगांना किरकोळ आर्थिक उत्पादने ती देते. तातडीचे वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, एसएमई कर्जे आणि गृहकर्ज यांचे वितरण स्पर्धात्मक व्याजदराने आणि सुलभ’ ईएमआय’च्या माध्यमातून कंपनीतर्फे करण्यात येते. डिसेंबर 2015 मध्ये ‘फुलरटन इंडिया’ने आपली गृहनिर्माण संस्था, ‘फुलरटन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड’ (एफआयएचएफसी) सुरू केली. तिला ‘गृहशक्ती’ म्हणूनही ओळखले जाते. देशातील 600 शहरांमध्ये व 58 हजार गावांमध्ये या कंपनीच्या एकूण 675 शाखा आहेत. त्यांतील 15,255 पेक्षा अधिक कर्मचारी 36 लाख ग्राहकांना सेवा देत आहेत.