पुणे – बार्कलेजने आज पुण्यातील खराडी येथे आपले नवे संकुल सुरू केले आहे. लंडन या जागतिक मुख्यालयाच्या बाहेरचे हे पहिले सर्वात मोठे सिंगल ठिकाण आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या संकुलामुळे बार्कलेजचे जागतिक जाळे अधिक सक्षम होणार आहे, नावीन्याला पाठबळ दिले जाणार आहे आणि भारतात ऑपरेशन्स व तंत्रज्ञान सेवा यांची सांगड घातली जाणार आहे. अमेरिकेतील व्हिपनी, यूकेतील ग्लासगो, तसेच जागतिक कनेक्टिविटी, स्मार्ट विचारसरणी व अत्याधुनिक तंत्रज्ञान याद्वारे फर्मच्या ग्राहकांना उत्तम मूल्य देणाऱ्या अन्य ठिकाणांबरोबरच, पुणे संकुल हे बार्कलेजचे जागतिक दर्जाचे नवे संकुल आहे.
अंदाजे 1.1 दशलक्ष चौरस फूट इमारत क्षेत्रामध्ये असणाऱ्या पुणे संकुलामध्ये भारतातील बार्कलेजच्या 19,000 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांपैकी 9,000 कर्मचारी बसणार आहेत. त्यामध्ये वैविध्यपूर्ण ग्राहकांसाठी स्मार्ट उपाय करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या आणि जगभर बार्कलेज देत असलेल्या घाऊक उपायांना पाठिंबा देणाऱ्या टीमचा समावेश असणार आहे. बार्कलेजमधील सध्याच्या गुणवत्तेचा लाभ घेण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक मूल्य देण्यासाठी टीमचे को-लोकेटिंग करण्यासाठी पुण्यातील संकुल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जागतिक बाजाराच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी नावीन्यपूर्ण सोल्यूशन निर्माण करण्याच्या दृष्टीने पुण्यातील संकुल स्थानिक गुणवत्तेला पैलू पाडणार आहे. श्रेणीतील सर्वोत्तम तंत्रज्ञान, चांगल्या पद्धती व स्मार्ट वापर याद्वारे बार्कलेजने ग्राहकांना वैयक्तिक स्वरूपाचा अनुभव, ऑटोमेटेड सोल्यूशन देण्याचे व कार्यात्मक कार्यक्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
संकुलामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि अद्ययावत वर्किंग स्पेस यांचा समावेश असेल व त्यातून टीम्समध्ये सहयोग, सर्जनशील विचारसरणी व नावीन्य यांना उत्तेजन दिले जाईल. संकुलातील विशेष सुविधांमध्ये, काम करण्यासाठी सहयोगात्मक साधनांबरोबर मनोरंजनात्मक, वेलनेस व सहयोगात्मक पैलू यांचा समावेश आहे. पर्यावरणाप्रती पाठिंबा व बांधिलकी दर्शवेल, अशा प्रकारे संकुलाचे डिझाइन व निर्मिती काळजीपूर्वक करण्यात आली आहे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या जाणाऱ्या डिझाइन, बांधकाम व उच्च कामगरीच्या हरित इमारतींचे कार्य यासाठीच्या दोन बेंचमार्कचे पालन करण्यात आले आहे: यूएस लीड (लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हॉयर्नमेंटल डिझाइन) आणि वेल सर्टिफिकेशन.
बार्कलेजचे ग्रुप चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मार्क अॅश्टन-रिग्बी यांनी सांगितले, “बार्कलेज जवळजवळ तीस वर्षे भारतात लक्षणीय काम करत आहे, आणि यापुढेही येथील गुंतवणूक कायम ठेवणार आहोत. पुण्यातील आमच्या नव्या संकुलामुळे भारतातील क्षमतेचा लाभ घेणे, सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाप्रती आमची बांधिलकी अधोरेखित करणे आणि यूके-इंडिया आर्थिक भागीदारीला उत्तेजन देणे यासाठी चालना मिळणार आहे. खऱ्या अर्थाने सहयोगाला व नावीन्याला उत्तेजन देईल, आम्ही ज्या प्रकारे काम करतो व व्यवसाय करतो त्यामध्ये बदल आणेल, असे वर्किंग स्पेस निर्माण करण्यासाठी हे संकुल मोलाचे योगदान देणार आहे.”
बार्कलेजचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल सर्व्हिस सेंटर फॉर इंडिया, उमा रत्नम कृष्णन म्हणाले “आमचा प्राधान्यक्रम राबवण्यासाठी, तसेच आमच्या सहकाऱ्यांनी ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी त्यांना सबल करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात सहयोग व नावीन्य यांना चालना देण्यासाठी बार्कलेजचे पुण्यातील नवे संकुल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारतातील आमच्या सर्व केंद्रांतील व जगभरातील ग्राहकांना आणि सहकाऱ्यांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यासाठी आमच्या क्षमता वाढवण्यावर आम्ही अधिक भर देणार आहोत.”
बार्कलेजचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल सर्व्हिस सेंटर फॉर इंडिया, प्रवीण कुमार म्हणाले, “बँकेसाठी तंत्रज्ञान केंद्र म्हणून, आमच्या टीमच्या को-लोकेटिंगमुळे मोठ्या प्रमाणात सहयोगाला चालना देण्यासाठी आणि आमच्या सहकाऱ्यांसाठी काम करण्याचे वेगळे मार्ग स्वीकारण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे आम्हाला बँकेसाठी आणि आमच्या ग्राहकांसाठी जलद व अधिक नावीन्यपूर्ण उपाय उपलब्ध करणे शक्य होणार आहे. बार्कलेजचे पुण्यातील अद्ययावत संकुल आम्हाला या श्रेणीतील सर्वोत्तम इंजिनीअरिंग गुणवत्ता आकृष्ट करण्यासाठी आणि आकर्षक व गतीशील वर्क कल्चर निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. भारतात काम करण्यासाठी महिलांसाठी आघाडीच्या 10 सर्वोत्तम कंपन्यांतील एक म्हणून वर्किंग मदर इंडिया व अवतार ग्रुपने अलीकडेच बार्कलेजला गौरवले. आमच्या सहकाऱ्यांना आकर्षक करिअर उपलब्ध करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे हे प्रतिक आहे. नव्या जागेमुळे प्रगतीसाठी गुंतवणूक करण्याची आमच्या बांधिलकी अधोरेखित होते, तसेच भारतातील आमच्या कार्यालाही यामुळे चालना मिळणार आहे.”
बार्कलेज ग्लोबल सर्व्हिस सेंटर (बीजीएससी):
बार्कलेज ग्लोबल सर्व्हिस सेंटर (बीजीएससी), इंडिया हे जागतिक क्षमता केंद्र असून, ते जगभर बार्कलेज व्यवसायांना पाठिंबा देते, तंत्रज्ञान, ऑपरेशन्स व फंक्शन्स यातील परिपूर्ण बिझनेस सोल्यूशन देते. आमच्या ग्राहकांना उत्तम परिणाम मिळावेत यासाठी परिवर्तनशील नावीन्य, नियंत्रण-केंद्री वातावरणामध्ये एकमेकाच्या सहयोगाने काम याद्वारे बीजीएससी ही तंत्रज्ञान-प्रणित व उत्कृष्ट कामगिरी करणारी आहे. आमच्याकडे प्रगती व जबाबदारी अशी संस्कृती आहे. सर्वसमावेशक वातावरणात सगळे जण एकत्र काम करतात आणि यशस्वी होण्यासाठी व बी मोअर @ बार्कलेजसाठी सर्वांना समान संधी मिळते.