BS6 एमिशन अपग्रेड केलेली XUV300 पेट्रोल ही पहिली महिंद्रा एसयूव्ही
अंतिम मुदतीच्या पूर्वी BS6 साध्य करण्यासाठी पुढाकार
क्लीनर मोबिलिटी तंत्रज्ञान हे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिंद्राचे योगदान कायम
मुंबई: महिंद्रा अँड महिंद्रा लि. या 20.7 अब्ज डॉलरच्या महिंद्रा समूहाचा भाग असणाऱ्या कंपनीने आकर्षक व थरारक XUV300 हे पहिले BS6 कम्प्लायंट वाहन आज दाखल केले. XUV300 ची BS6 आवृत्ती 1.2 लिटर टर्बो पेट्रोल प्रकारात उपलब्ध असेल.
एप्रिल 1, 2020 या अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर, महिंद्रा टप्प्याटप्प्याने आपल्या वाहनांचे रूपांतर BS6 एमिशन स्टँडर्ड्समध्ये करत आहे.
पहिले BS6 वाहन दाखल करत असल्याबद्दल बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, “आमचे पहिले BS 6 वाहन दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. BS6 परिवर्तनाच्या आमच्या
वाटचालीतील हा मैलाचा टप्पा आहे. वेळेची मर्यादा असूनही, आम्ही पुरवठादारांच्या मदतीने, निश्चित केलेल्या मुदतीच्या बरेच
आधी एमिशन नियमांचा गरजा पूर्ण केल्या आहेत. आम्ही क्लीनर एमिशन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व उत्पादनांमध्ये बदल करणार
आहोत.”
हवामानातील बदलांसारख्या समस्या भेडसावत असताना, वाहतुकीच्या अधिक स्वच्छ, अधिक शाश्वत पर्यायाचा अवलंब करण्याची
ही अचूक वेळ आहे. ‘मेक-इन-इंडिया’ या अभियानाच्या अनुषंगाने, कंपनी एप्रिल 2020 पूर्वी BS6 कम्प्लायंट वाहने दाखल
करण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे.
महिंद्राविषयी
20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, वाहतूक सुविधांमध्ये नावीन्य आले
पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली
पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व
व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे.
कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील,
रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे
240,000 कर्मचारी आहेत.