- टायगरच्या अकाउंटला एकाच दिवसात मिळाले 500K हून अधिक फॉलोइंग
- चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी हॅलोवर येणाऱ्या शिल्पा शेट्टी व विजय देवराकोंडा या प्रसिद्ध सेलिब्रेटींमध्ये आता टायगरचाही समावेश
नवी दिल्ली: – प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ लाखो चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी नुकताच हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया अॅपवर सहभागी झाला आहे. थरारत भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला लोकप्रिय अभिनेता व सोशल मीडिया युजर टायगर आता हॅलोवर आला असून तेथे तो त्याचा फिटनेस व नृत्य, त्याच्या चित्रपटातील व प्रत्यक्ष जीवनातील किस्से आणि त्याच्या उत्कृष्ट पोस्ट हॅलोवर 15 विविध भाषांमध्ये चाहत्यांसाठी उपलब्ध आहेत. हॅलोवर अकाउंट तयार केल्यावर एकाच दिवसात टायगरला 600K हून अधिक फॉलोइंग मिळाले आहे. चाहत्यांशी जोडले जाण्यासाठी आणि आपल्या प्रत्यक्ष जीवनातील व पडद्यावर किस्से सांगण्यासाठी हॅलोचा वापर करणाऱ्या प्रमुख सेलिब्रेटींमध्ये आता टायगरचा नव्याने समावेश झाला आहे.
या सुविधेशी जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त करताना टायगर श्रॉफ यांनी सांगितले, “हॅलोमध्ये सहभागी झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे आणि या सुविधेद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे. सर्व चाहत्यांपर्यंत पोहोचणे आणि ते जिथे असतील तिथे त्यांच्याशी जोडलेले राहणे, हा माझा प्रयत्न असणार आहे. हॅलोचे आभार, आता चाहत्यांसाठी त्यांच्या मातृभाषेमध्ये मला कण्टेण्ट निर्माण व शेअर करता येणार आहे”.
टायगर श्रॉफ सोशल मीडिया हँडल्सवर उत्तम पोस्ट शेअर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विनम्रता हा टायगरचा सर्वांना माहीत असणारा स्वभावविशेष असून त्यामुळेच तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. टायगर सध्या सर्बिया येथे ‘बागी 3’ या आगामी अॅक्शन ड्रामाचे चित्रिकरण करतो आहे.
प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी भारतीय फिल्मजगतातील अनेक सेलिब्रेटी हॅलोमध्ये सहभागी झाले आहेत. हन्सिका मोटवानी ही हॅलोवर जाणारी पहिलीवहिली लोकप्रिय कलाकार ठरली. शिल्पा शेट्टी, विजय देवराकोंडा व अन्य अनेक सेलिब्रेटींनी हॅलोचा स्वीकार केला आहे आणि ते दररोज त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात.
हॅलोविषयी
हॅलो ही भारतातील आघाडीची प्रादेशिक सोशल मीडिया सुविधा आहे. तुमच्या स्वतःच्या भाषेत कण्टेण्ट निर्माण व शेअर करण्याची, जास्तीत जास्त लोकांशी जोडलेले राहण्याची सोय देणे, हे हॅलोचे उद्दिष्ट आहे. हॅलो हिंदी, तेलुगु, मल्याळम, तामिळ यासह 15 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.