हेलोच्या फ्रायडे फीव्हरवर दोघांचा हास्यकल्लोळ
हेलोच्या व्यासपीठावर या स्टार्सनी आपल्या चाहत्यांशी शेयर केली सिनेमा प्रदर्शनपूर्वीची उत्सुकता
नवी दिल्ली – आगामी ‘पानीपत’ सिनेमाचा माहौल तयार करत अर्जुन कपूर आणि क्रीती सेनॉन यांनी हेलो फ्रायडफीव्हरमध्ये शूटिंगदरम्यानच्या गमतीजमती सांगितल्या. हेलोच्या या ऑनलाइन शोच्या नव्या एपिसोडमध्ये अर्जुन- क्रीती या जोडीने त्यांचा आगामी सिनेमा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. या दोघांनी आपल्या भूमिकांची माहिती सांगितलीच, शिवाय या भूमिका आणि त्यांच्या खऱ्या स्वभावातले समान धागेही उलगडले. अर्जुन आणि क्रीती या सिनेमा सदाशिवराव भाऊ आणि पार्वती बाई यांच्या भूमिकांत दिसणार आहेत.
पानीपत हा भारतीय, ऐतिहासिक, युद्ध सिनेमा असून तो पानीपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. अर्जुन कपूर, क्रीती सेनॉन आणि संजय दत्त या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 6 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळेस अर्जुन आणि क्रीती या दोघांनी सिनेमा बनवण्याआधी करण्यात आलेल्या सखोल संशोधनाची माहिती देत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना गमतीत ‘इतिहासाचं पुस्तक’ असं नाव असलं. एका फेरीमध्ये अर्जुननं सदाशिवरावांची व्यक्तीरेखा ‘सगळ्यांचं ऐकणारी, काहीजणांकडून शिकणारी आणि कोणाचंही अनुकरण न करणारी’ असल्यामुळे जवळची वाटल्याचं उघड केलं. त्याचप्रमाणे पार्वतीबाई जशा आपल्या नवऱ्याच्या रक्षणासाठी कायम तत्पर असतात, तसं आपणही प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या लहान बहिणीचं सतत रक्षण करत असतो, असं क्रीती म्हणाली. अर्जुन आणि क्रीती यांनी काही मजेदार प्रश्नांची उत्तरं दिली आणि ‘सगळ्यात जास्त रिटेक्स कोणी घेतले’ असं विचारल्यावर दोघांनी एकमताने घोड्याचं नाव घेत धमाल उडवून दिली.
सिनेमाच्या निवडीबद्दल विचारल्यानंतर क्रीतीनं रोमँटिक सिनेमांना पसंती असल्याचं सांगत तोच आपला ‘ड्रीम’ सिनेमा असल्याचं शेयर केलं, तर अर्जुननं आपल्याला भयपट जास्त आवडत असल्याचं सांगितलं.
फ्रायडेफीवर हा अशाप्रकारचा पहिलाच ऑनलाइन शो आहे, ज्यामध्ये हेलो चाहत्यांना त्यांच्या आवडीच्या सिनेमास्टार्सच्या जवळ घेऊन जाते. या व्यासपीठावर स्टार्स त्यांच्या आगामी सिनेमाबद्दलची उत्सुकता आणि अपेक्षा शेयर करतात. सिनेमा कलाकारांना शुक्रवारबद्दल वाटणार्या अस्वस्थ उत्सुकतेवर आधारित असलेल्या या शोमध्ये प्रश्न- उत्तरांचा खेळ रंगतो.
हेलोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये भारतातील आघाडीचे कलाकार नवाझुद्दीन सिद्दीकी त्यांच्या मोतीचूर- चकनाचूर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येऊन गेले होते. या एपिसोडच्या प्रोमोला हेलोच्या युजर्सनी केवळ चार दिवसांत त्याला 10 दशलक्ष व्ह्यूज, 20 हजार लाइक्स आणि एक हजारपेक्षा जास्त शेयर मिळवून दिले.