नवी दिल्ली: सीबीआरई साउथ एशिया प्रा. लि. या जगातील आघाडीच्या रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्मने कॉर्पोरेट फिलांथ्रोपी प्रोग्रॅम असलेले ‘सीबीआरई केअर्स’ हे आपले फाउंडेशन भारतात सुरू केल्याची घोषणा आज केली आहे आणि देशातील विविध ठिकाणच्या स्थलांतरित कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या (महिला व बालके) आरोग्याशी व पोषणाशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले आहे. सीबीआरईने देशात 25 यशस्वी वर्षे पूर्ण केली असताना सीबीआरई केअर्स सुरू होत आहे.
सीबीआरईच्या जागतिक कार्यक्रमाची सीबीआरई केअर्स – एक पहल ही भारतातील आवृत्ती सीबीआरई ग्रुप इंकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट ई. सलेंटिक व भारत, आग्नेय आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका येथील अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझिन यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने (एनएसएसओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, बांधकाम क्षेत्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एम्प्लॉयर असून त्यामध्ये अंदाजे 50 दशलक्ष लोक कार्यरत आहेत. यातील बहुसंख्य लोकसंख्या स्थलांतरित कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची आहे आणि त्यांच्यासाठी मूलभूत आरोग्य सुविधा, स्वच्छ वातावरण व जागृती यांची सहज उपलब्धता होत नाही व त्यांना तीव्र कुपोषण व असुरक्षित वातावरण यांचा सामना करावा लागतो. स्थलांतरित कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मूलभूत आरोग्यसेवा उपलब्ध होण्यातील दरी भरून काढण्याच्या हेतूने “एक पहल” हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना, सलेंटिक यांनी सांगितले, “वेगळेपण सिद्ध करणे, हे सीबीआरई केअर्स प्रोग्रॅमचे विशेष वैशिष्ट्य आहे आणि “एक पहल” उपक्रम स्थलांतरित कामगार व त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सीबीआरईमध्ये, आम्ही समाजाचे ऋण फेडण्याला महत्त्व देतो आणि त्यामध्ये योगदान देण्यासाठी एक पहल हा उपक्रम इतरांनाही प्रेरणा देईल, याची खात्री आहे,” असे त्यांनी सांगितले.
याविषयी बोलताना, सीबीआरईचे भारत, आग्नेय आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका येथील अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझिन यांनी सांगितले, “सीबीआरई फाउंडेशन भारतात आणणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. स्थलांतरित कामगारांना मदत करणे, ही आमची जबाबदारी आहे आणि एक पहल उपक्रम हे मोठे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. या उपक्रमाने दिलेल्या योगदानाची निश्चित दखल घेतली जाईल.”
येत्या काही महिन्यांत, सीबीआरई केअर्सची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सीबीआरई सरकार, कॉर्पोरेट्स व नॉन-प्रॉफिट संस्था यांच्याशी सहयोग करणार आहे. चॅरिटेबल संस्थेची निवड करताना, राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प राबवण्याची आणि स्थलांतरित कामगारांना सहभागी करून घेण्याची, त्यांच्या समस्या समजून घेण्याची व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य व पोषणविषयर समस्या सोडवण्याची क्षमता ही पात्रता तापसली जाणार आहे.
देशातील स्थलांतरित कामगारांसमोर असणारे काही प्रश्न आहेत – दुर्लक्ष, असुरक्षित पर्यावरण, कुपोषण, अस्थिरता, शाळा सोडणे, दर्जेदार आरोग्यसेवा व पोषण यांची अनुपलब्धता, वेगळ्या किंवा चांगल्या जीवनाबद्दल आशेचा अभाव याकडे लक्ष दिले जाणार आहे.