पुणे-: ऊर्जासंवर्धन हा जागतिक शाश्वत ऊर्जा प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. टाटा पॉवरने कायमच एक पर्यावरणपूरक जबाबदार कंपनी म्हणून काम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कंपनीच्या जोजोबेरा ऊर्जा केंद्राला १०व्या सीआयआय एनर्जी कंझर्वेशन–२०१९ (एनकॉन) या पुरस्कार सोहळ्यात फोर स्टार्स मानांकनाने गौरवण्यात आले. या ऊर्जाकेंद्राने ऊर्जाबचतीबाबत ठेवलेल्या कल्पक दृष्टिकोनाबद्दल हा पुरस्कार कंपनीला प्रदान करण्यात आला.
टाटा पॉवरच्या जोजोबेरा ऊर्जाकेंद्राने केलेल्या सादरीकरणात ते ऊर्जा संवर्धनासाठी करत असलेल्या विविध उपायांची माहिती देण्यात आली. त्यांच्या विशेष प्रकल्पांपैकी एक असलेल्या “३ सीडब्ल्यू ऑपरेशन्स इन युनिट २ अँड ३”वर सादरीकरणात विशेष भर देण्यात आला. सीआयआय इनकॉन परिषदेत विविध उद्योगातील १००हून अधिक टीम्स सहभागी झाल्या होत्या. ऊर्जाबचतीसाठी करत असलेल्या कल्पक उपायांचे सादरीकरण त्यांनी सर्वांपुढे केले. यापैकी ५० टीम्सना त्यांची कल्पकता व त्यांच्या ऊर्जाबचतीचा एकंदर प्रभाव यांवर आधारित गुणांकन देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ऊर्जा व वीज उद्योगांतील अनेक आघाडीचे उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी भारतातील विजेबाबतची परिस्थिती आणि कंपन्या आयओटी, स्मार्ट ग्रिड, ईव्हीज, स्मार्ट मीटरिंग आदी नवीन तंत्रज्ञानांचा वापर करून अधिक चांगली ऊर्जाकार्यक्षमता तसेच शाश्वतता यांसाठी कशा सज्ज होत आहे याबद्दल माहिती दिली.
जमशेदपूर ऑपरेशन्सचे प्रमुख तसेच आयईएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजयंत रंजन यांनी टीमने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, “आपण ऊर्जासंवर्धनाप्रती दाखवत असलेल्या बांधिलकीची दखल घेतली गेली याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ऊर्जासंवर्धनाच्या आपल्या उद्दिष्टाप्रती पोहोचण्यासाठी आपण अशाच नवोन्मेषकारी पद्धतींचा अवलंब सुरू ठेवू अशी आशा वाटते.”
कंपन्या ऊर्जासंवर्धनासाठी मानत असलेल्या उदाहरण द्यावे अशा बांधिलकीची तसेच दृष्टीची दखल एक्सलन्स इन एनर्जी कॉंझर्वेशन (एनकॉन) अवॉर्डद्वारे घेतली जाते. ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी सदस्य कंपन्या करत असलेल्या पद्धतशीर, प्रशंसनीय व भरीव प्रयत्नांना तसेच ऊर्जा संवर्धनात लक्षणीय प्रगती साधण्यासाठी दृष्टीने केल्या गेलेल्या प्रयत्नांना मान्यता देणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.