मूळ पुण्याच्या दुरावस्थेचं भयान चित्र … कुठवर लपविणार ,कुठवर झाकणार ?
पुणे- कसबा … नावातच दम आहे इतिहास आहे, पुण्याचं ताकदवान अस हे नाव … शिवाय भाजपचा बालेकिल्ला 25 वर्षे इथे भाजपचा आमदार सातत्याने नगरसेवक याच विधानसभा मतदार संघातील मुक्ता टिळक महापौर झालेल्या, तब्बल अडीच वर्षे ..त्या या पदावर .. दिल्ली ट जावून तर कधी परदेशात जावून शान मध्ये त्यांनी स्मार्ट पुण्याची पारितोषिके स्वीकारलेली ….पण त्यांच्या या बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदार संघाची अवस्था काय आहे ? ते कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांना आणि त्यांच्या समवेत प्रचारासाठी फिरणाऱ्याना चांगलीच जाणवू लागली आहे …
एकीकडेमाणसे वाहून चाललीत आणि तुम्ही साधे नळाला प्यायला पाणी देवू शकत नाही काय ? अशा प्रश्नाना सामोरे जावे लागतेय … स्मार्ट पुण्याची,ऐतिहासिक पुण्याची हि खरी अवस्था .. कुठवर लपवून ठेवणार आणि झाकून ठेवणार ? अशा प्रश्नांनी संताप व्यक्त करण्याची कामे मतदार करताहेत …
कसबा विधानसभा मतदार संघात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे उमेदवार अरविद शिंदे यांच्या प्रचार फेरीतील हि पहा 1 अल्पशी झलक …