पुणे- ५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर ,पुण्यात ६० तास एक हि कोरोनाग्रस्त आढळून आला नाही त्यानंतर आज आणखी २ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे .पुण्यातील आणखी २ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ६व्या आणि ७व्या रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. दोघांच्याही डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. डॉ. नायडू रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि टीमचे महापौरांनी अभिनंदन केले आहे .