मागच्या सरकारांनी अनुदाने देऊन लोकांना पंगु बनविले
रोजगार निर्मिती आणि पगारवाढी साठी भाजपच्या पुण्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत
पुणे- कोरोनाच्या काळात असंख्य गोरगरीब लोकांचे ,ज्यांचे हातावर पोट आहे अशांचे हाल झाले ,पण भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड आणि त्यांचे बंधू दिनेश गायकवाड यांनी कोणताही विचार न करता लोकांना मदत करणारे अनेक कार्यक्रम राबविले आणि लोकांना मदतीचा हाथ पुढे केला. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहेच या सर्वांनी .पण आता कोरोना नंतर काय? याचा हि विचार करायला हवा ,पुण्यात भाजपचे ६ आमदार आहेत ,१०३ नगरसेवक आहेत , ४० वर्षाचा भक्कम अनुभव असलेले खासदार गिरीश बापट इथे नेते आहेत . या सर्वांनी आता या पुढे ज्याला ४ हजार पगार आहे त्याला ८ हजार रुपये पगार कसा मिळेल आणि रोजगार निर्मिती करून तरुणाईला स्वपायावर कसे उभे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे व्यक्त केले .कोरेगाव पार्क मधील भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी १ नोव्हेंबर पासून प्रभागातील १५००० कुटूंबांना घरोघरी जाऊन दिवाळी रेशन किट चे वाटप करणे आणि सोसायटी मधील ५ हजार कुटुंबाना दिवाळी भेट देणे या उपक्रमाचा आज औपचारिक प्रारंभ आ. पाटील यांच्या हस्ते केला यावेळी खासदार गिरीश बापट , भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक,राजेश पांडे,राहुल कुल ,आ. सुनील कांबळे ,दिलीप कांबळे , श्रीनाथ भिमाले,बाप्पू मानकर ,योगेश पिंगळे, ,निवृत्त लेफ्टनंट कर्नल शेकटकर ,सुनील माने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्च महिन्यात कोरोना चा फैलाव सुरु झाल्यापासून गायकवाड बंधू यांनी केलेल्या कार्याची माहिती देऊन या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील आणि महापालिका स्तरावरील अधिकारी यांना कोविड बद्दल केलेल्या कामांबाबत सन्मानित करण्यात आले. यावेली बोलताना आ. पाटील म्हणाले ,’ पैसा अनेकांकडे असतो ,पण अडचणीच्या काळात तो हलाखीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला वापरणे याला दानत लागते ती गायकवाड यांच्याकडे आहे. पुण्यातील अनेक लोक हे करू शकतात . त्यांनी पुढे आले पाहिजे . कोरोना आला तेव्हा लॉकडाऊन चा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षावधींचे प्राण वाचविले आणि आरोग्यव्यवस्थेच्या स्तरावर अगदीच दुर्बल असलेल्या देशाला सबळ करून दाखविले . जगदीश मुळीक यांचेही यावेळी भाषण झाले . प्रास्तविक उमेश गायकवाड यांनी केले तर आभार दिनेश गायकवाड यांनी मानले.

