आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी :
भगवान महावीर स्वामी 2614 वे जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आळंदी रोड, संत तुकारामनगर येथील चौकाचे ‘भगवान महावीर चौक’ असे नामकरण भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. भोसरी गावठाण ते रामस्मृती लॉन्स दरम्यान अहिंसा रॅली काढण्यात आली. यावेळी महापौर नितीन काळजे, कामगार नेते सचिन लांडगे, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, नगरसेवक जालिंदर शिंदे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, दत्ता गव्हाणे, राहुल गवळी, विजय लांडे, तुकाराम भोपते पाटील, अजित रमेश गव्हाणे, गवळी फार्मचे पंडितशेठ गवळी, योगेश गवळी, भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा (जैन समाज)चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मुकेश ओसवाल, श्री वर्धमान जैन स्तानक संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, श्री. विमलनाथ जैन राजस्थानी श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघाचे अध्यक्ष सुमनलाल सोलंकी, राकेश जैन, मितेश दोशी, गणेश बागमार, बंटी ओसवाल, तसेच जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना थंड पेय वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी अहिंसेला मानवाचा उच्चतम नैतिक गुण मानला. त्यांनी जैन धर्माची अहिंसा, सत्य, अपरिगृह, अस्तेय आणि ब्रम्हचर्य ही पंचशील तत्वे सांगितली. त्यांनी आपल्या जीवनात उपदेश आणि प्रवचनांच्या माध्यमातून जगाला मानव कल्याणाची योग्य दिशा दाखवली. त्यांनी दिलेला अहिंसेचा संदेश आचरणात आणण्याची आज खर्या अर्थाने गरज आहे.

