पुणे : बिबवेवाडी येथील गौरव गणेश घुले यांच्या पुढाकारातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित शिबिरात १०२ रक्तदात्यानी रक्तदान केले. महेश सोसायटीतील दत्त मंदिर आवारात सह्याद्री हॉस्पिटलच्या ओम ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन राजश्री देशमुख, देवांगी आरोळे, गंगा शिळीमकर यांनी केले. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, गणेश घुले, गणेश मोहिते, वाल्मिकी कोळी, राजू पठारे आदी उपस्थित होते.
गौरव घुले म्हणाले, “स्वराज्यासाठी रक्त सांडता आले नाही. पण सुराज्यासाठी रक्तदान करुन राष्ट्रीय एकात्मतेचा धागा अधिक मजबूत करुयात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शहरातील ब्लड बॅंकांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरावर विशेष भर दिला आहे.”
गौरव घुलेंच्या पुढाकारातून १०२ लोकांचे रक्तदान
Date:

