डीबीएस बँक इंडिया लिमिटेडने पुण्यातील स्थानिक व्यवसाय केले सक्षम

Date:

पुणेभारताप्रतीची बांधिलकी अधोरेखित करत, डीबीएस बँक इंडिया लिमिटेडने पुण्यातील एसएमई ग्राहकांसाठी व्हिजन व सोल्यूशन्स सादर केली आहेत. अलीकडेच, बँकेने एमआयडीसीतील पिंपरी कॉलनीमध्ये पिंपरी-चिंचवडमधील शाखा सुरू केली आहे. शाखा लहान व मीडिअम व्यवसायांच्या व रिटेल ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैविध्यपूर्ण व सर्वंकष उत्पादने व सेवा उपलब्ध करते.

गेल्या वर्षी, डीबीएसने डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (डीबीआयएल) ही संपूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करून भारतातील प्रवासामध्ये महत्त्वाचा मैलाचा टप्पा साध्य केला. डीबीआयएलद्वारे बँकेने प्रगतीच्या योजनांना वेग देण्याचे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रात सध्या डीबीएस पुणे, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक येथे कार्यरत आहे, तसेच बँकिंग सेवा उपलब्ध नसलेल्या अम्बप, खोची, अमलवाड, धनवाड, बोरावडे, सुलकुड, निगवे व दुमाळा या ग्रामीण ठिकाणी सेवा देत आहे. 

 एसएमई क्षेत्रासाठी केलेल्या नियोजनाबद्दल बोलताना, डीबीएस बँक इंडिया लिमिटेडचे बिझनेस बँकिंग हेड सुदर्शन चारी यांनी सांगितले, “डीबीएसमध्ये आम्ही स्थानिक व्यवसायांना सबल करण्यासाठी आणि भारतीय एसएमई क्षेत्राच्या प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी कार्यरत आहोत. आमच्या सेवेद्वारे, व्यवसाय करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे आणि एसएमईंना त्यांच्या व्यवसायाच्या विस्ताराच्या दृष्टीने विविध संधींचा लाभ घेण्यास मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भारतीय एसएमईंचे आमचे सखोल आकलन आणि जगभरातील एंटरप्रायजेसना सेवा देण्याची 50 वर्षांची परंपरा यामुळे आम्हाला या एंटरप्रायजेसच्या भविष्यातील प्रगतीसाठी मार्गक्रमण करणे आम्हाला शक्य होणार आहे.”

 आम्ही अलीकडेच पिंपरी-चिंचवड शाखा सुरू केली आहे. या शाखेमुळे आम्हाला आमचा व्यवसाय अधिक सक्षम करणे आणि स्थानिक एसएमईंना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे. हा परिसर पुण्यातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक आहे आणि गेल्या काही वर्षांत या परिसराने आयटी व तंत्रज्ञान स्टार्टअपना आकृष्ट केले आहे”, असे त्यांनी नमूद केले.

 2018 2019 या वर्षांतबेस्ट बँक इन द वर्ल्डम्हणून गौरवण्यात आलेली डीबीएस बँकिंगच्या भविष्याला आकार देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. बँकेने ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात बँकिंगचा सुरळीत समावेश करण्यासाठी एंड-टू-एंड डिजिटाइज्ड सोल्यूशन तयार केली आहेत.

 व्यवसायांसाठी, डीबीएसने संपूर्ण बँकिंग चक्राला सेवा देण्यासाठी आणि वेळेची चणचण असणाऱ्या व्यवसाय मालकांना बँकिंग अधिक सुलभ व सोयीचे बनवण्यासाठी सोल्यूशन तयार केली आहेत. जिकिरीची कागदपत्रे कमी करतील आणि सुरळित, विना-स्वाक्षरी, पेपरलेस बँकिंग सेवा देतील, अशी एंड-टू-एंड डिजिटाइज्ड सोल्यूशन व प्रक्रियाही बँकेने तयार केल्या आहेत. या सेवा एसएमई मालकाला संपूर्ण बँकिंग चक्राला सेवा देतात आणि व्यवहारविषयक त्यांच्या अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रेडशी संबंधित सेवा व सोल्यूशनमध्ये एक्स्प्रेस खाते उघडणे, डिजि बिझनेस लोन, कलेक्शन सोल्यूशन यांचा समावेश करतात.

 अगोदर, डीबीएसने एसएमईंना जीएसटी भरणे व अकाउंटिंग प्रक्रिया  करणे सोपे व्हावे, या हेतूने 2017 मध्ये टॅली सोल्यूशन्सबरोबर भागीदारी केली होती. एकात्मिकरणाद्वारे, टॅली युजरना कर भरणे व अकाउंटिंग प्रक्रिया डिजिटाइज करता येऊ शकतात व त्यासाठी त्यांना त्यांच्या पसंतीची सुविधा बदलण्याचीही आवश्यकता नाही.

 2016 मध्ये, संपूर्ण बँक एका स्मार्टफोनमध्ये सामावण्याच्या हेतूने डीबीएसने डिजिबँक ही भारताची पहिली पूर्णतः डिजिटल बँक दाखल केली. दाखल करण्यात आल्यापासून, डिजिबँकेने 2.5 लाख ग्राहक मिळवले आहेत. बचत खात्यांबरोबरच, डिजिबँक अनसिक्युअर्ड लोनही देते. डिजिबँक ही विविध फंड हाउसेसकडून म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी पेपरलेस सुविधा देणारी पहिली आहे.

 डीबीएसविषयी

 सिंगापूरमध्ये सूचिबद्ध असणारा व तेथे मुख्यालय असणारा डीबीएस समूह हा आशियातील आघाडीचा वित्तीय सेवा समूह असून तो 18 देशांमध्ये कार्यरत आहे डीबीएस समूहाचे “AA-” “Aa1” क्रेडिट रेटिंग जगातील सर्वाधिक रेटिंगपैकी एक आहे. डीबीएस बँक भारतामध्ये 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून बँकेने 1994 मध्ये मुंबई येथे पहिले कार्यालय सुरू केले.

 डीबीएस बँक इंडिया लिमिटेड ही भारतात पूर्णतः मालकीची, स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आलेली उपकंपनी सुरू करणाऱ्या आघाडीच्या जागतिक बँकांपैकी एक मोठी परकीय बँक आहे. डीबीएस भारतातील व्यक्तिगत ग्राहक आणि लार्ज, मीडिअम व स्मॉल एंटरप्रायजेस यांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध करते. 2016 मध्ये, डीबीएसने डिजिबँक ही भारतातील पहिली, मोबाइल-ओन्ली बँक सुरू केली आहे. या बँकेचे आता 2.5 दशलक्षहून अधिक ग्राहक आहेत. सध्या 23 शहरांत कार्यरत असणारी बँक संपूर्ण मालकीची उपकंपनीमध्ये रूपांतरित झाल्यापासून भारतात विस्तार करत आहे. बँक सध्या ज्या शहरांत कार्यरत आहे तेथे बँकेला विस्तार करायचा आहे, तसेच बँकेला 100 हून अधिक कस्टमर टचपॉइंटद्वारे नव्या ठिकाणांपर्यंत पोहोचायचे ठरवले आहे.

 जागतिक स्तरावरील नेतृत्वासाठी नावाजल्या जाणाऱ्या डीबीएसने युरोमनीकडून वर्ल्ड्स बेस्ट बँक, द बँकरकडून ग्लोबल बँक ऑफ द इयर आणि ग्लोबल फायनान्सकडून बेस्ट बँक इन द वर्ल्ड हा गौरव मिळवला आहे. बँकिंगच्या भवितव्याला आकार देण्याच्या हेतूने, बँक डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या बाबतीत आघाडीवर असून, बँकेने युरोमनीकडून वर्ल्ड्स बेस्ट डिजिटल बँक सन्मान मिळवला आहे. याबरोबरच, डीबीएसला 2009 ते 2019 अशी सलग अकरा वर्षे ग्लोबल फायनान्सतर्फे सेफेस्ट बँक इन एशिया हा पुरस्कार मिळाला आहे.

डीबीएस ग्राहकांशी गहिरे नाते निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असते आणि ती आशियातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणचे ग्राहक व बाजारपेठ यांना जोडत असल्याने, सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देऊन समाजामध्ये सकारात्मक परिणाम घडवते. डीबीएस समूहाचे फौंडेशन आशियातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणच्या सोशल एंटरप्रायजेसबरोबर काम करते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...