दागिन्यांसाठीचा भारतातील सर्वात पसंतीचा ब्रँड म्हणून कल्याण ज्वेलर्सने जिंकला प्रतिष्ठित सुपरब्रँड्स 2019- 2020

Date:

सर्वाधिक ग्राहक गुणांसह कल्याण ज्वेलर्सने स्पर्धकांवर मात करून मिळवले आघाडीचे स्थान

 पुणे– भारतातील सर्वात पसंतीचा आणि आघाडीचा दागिन्यांचा ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या कल्याण ज्वेलर्सने भारतातील सर्वाधिक पसंतीचा दागिन्यांचा ब्रँड विभागात सुपरब्रँड 2019-20 हा पुरस्कार जिंकला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार ग्राहकांनी केलेल्या मतदानानुसार भारतातील सर्वात शक्तीमान ब्रँड्सची निवड करतो. याचाच एक भाग म्हणून घेण्यात आलेल्या विस्तृत ऑनलाइन ग्राहक मतदान प्रक्रियेमध्ये कल्याण ज्वेलर्सला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करत प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले. यापूर्वी कल्याण ज्वेलर्सच्या युएई विभागाने सलग चार वेळा हा पुरस्कार जिंकला होता.

सचोटी, विश्वास, दर्जा, पारदर्शकता आणि नाविन्य यांवर भर देणाऱ्या ग्राहकाभिमुख व्यवसाय पद्धतीसह कल्याण ज्वेलर्सने या क्षेत्रात मापदंड प्रस्थापित का आहे. ग्राहकांना नाविन्यपूर्ण सेवा देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या क्षेत्रात नवनवे मापदंड प्रस्थापित करण्याच्या पद्धतीमुळे ब्रँडने आघाडीचे स्थान मिळवले आहे. 1993 मध्ये स्थापना झाल्यापासूनच कल्याण ज्वेलर्सने भारतीय दागिने क्षेत्रात नीतीपूर्ण व्यवसाय पद्धतींचा प्रसार व अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले आहे.

बीआयएस हॉलमार्किंग पद्धत वापरणारा भारतातील पहिला दागिन्यांचा ब्रँड, पारदर्शक किंमती, 4 स्तरीय खात्रीशीर प्रमाणपत्र देणारा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम अशा विविध मार्गांद्वारे कल्याण ज्वेलर्सने कायमच ग्राहकाला आपल्या प्रत्येक उपक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवले. त्याला नुकत्याच पार पडलेल्या 300 किलो सोने अभियान आणि 3 लाख सोन्याच्या नाण्याचे वितरण करणाऱ्या अभियानाची जोड मिळाली.

 याप्रसंगी कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. टी. एस. कल्याणरामन म्हणाले, ‘सुपरब्रँड्स इंडियाकडून मिळालेल्या या सन्मानाने आम्ही भारावून गेलो आहोत. हा विजय जास्त महत्त्वाचा आहे, कारण युएईमध्ये सलग चारदा हा सन्मान मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारतात आम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे. आमचे ग्राहक कल्याण ज्वेलर्स कुटुंबाचा एक भाग आहेत आणि त्यांना खरेदीचा अभूतपूर्व अनुभव देण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशईल असतो. त्यांच्या विश्वासामुळेच आम्हाला विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचे बळ मिळते.’

 

ग्राहकांना आता सोन्याच्या दागिन्यांवर नवे चार स्तरीय हमी प्रमाणपत्राचे फायदेही मिळवता येणार आहेत. निष्ठावान ग्राहकांप्रती असलेली ब्रँडची बांधिलकी उंचावण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने हा खास उपक्रम हाती घेतला आहे. कल्याण ज्वेलर्समधे विकल्या जाणाऱ्या दागिन्यांवर विविध प्रकारच्या शुद्धता चाचण्या केल्या जात असल्या आणि सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क दिलेले असले, तरी चार स्तरीय हमी प्रमाणपत्र ग्राहकांना खरेदी पावतीमध्ये नमूद केलेल्या शुद्धतेचे मूल्य ते दागिने बदली किंवा पुनर्विक्री करताना देण्याची खात्री देते. त्याशिवाय यामध्ये कल्याण ज्वेलर्सच्या देशभरातील दालनांमध्ये दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल करून दिली जाते.

दागिने क्षेत्रातील आघाडीच्या ब्रँड्सपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने नुकतीच भारतातील कामकाजची 27 वर्ष पूर्ण केली. 1993 मध्ये एका दालनासह सुरुवात करत आज देशभरात तसेच युएईमधील जीसीसी (गल्फ कोऑपरेशन कौन्सिल), कतार, ओमान आणि कुवैतसह त्यांची 144 दालने कार्यरत आहेत. ब्रँड ‘कंदेरे’ या ऑनलाइन दागिने संकेतस्थळासह ऑनलाइन विश्वातही कार्यरत आहे.

 

कल्याण ज्वेलर्सबद्दल

केरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. 1993 मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत.

कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून 144 दालने कार्यरत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...