व्होल्टास बेकोच्या भारतातील पहिल्या कारखान्याचा शुभारंभ

Date:

गुजरातेतील सानंद येथे असलेल्या या कारखान्यामध्ये १८० मिलियन यूएस डॉलर्स गुंतवणुकीसह २.५ मिलियन घरगुती उपकरणे बनवण्याची उत्पादन क्षमता निर्माण होईल

सानंद:  भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड व्होल्टास आणि युरोपातील आघाडीची फ्री स्टँडिंग कन्ज्युमर ड्युरेबल्स कंपनी अर्केलिक यांची भागीदारी असलेली व्होल्टबेक होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड (व्होल्टबेक) या कंपनीने भारतातील आपल्या पहिल्या उत्पादन कारखान्याचा शुभारंभ झाल्याची घोषणा आज केली. गुजरातेत अहमदाबादजवळ औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सानंदमध्ये ६० एकर जागेवर असलेल्या या कारखान्यात घरगुती वापराची उत्पादने तयार केली जातील.  यामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स यांचा समावेश  असेल. तब्बल १८० मिलियन यूएस डॉलर्सची (१००० कोटींपेक्षा जास्त रुपये) गुंतवणुकीसह व्होल्टबेकचे सानंद युनिट हे गुजरात राज्यातील पहिले “व्हाईट गुड्स” (घरगुती वापराची इलेक्ट्रिकल उपकरणे) बनवणाऱ्या पहिल्या युनिट्सपैकी असेल ज्यामध्ये या क्षेत्रात घरगुती उपकरणांसाठी ओईएम बेस निर्माण केला जाईल तसेच स्थानिकांसाठी रोजगार संधी निर्माण होतील.

 या अत्याधुनिक कारखान्यामध्ये अर्केलिकच्या निर्माण आणि उत्पादन विकास क्षेत्रातील जागतिक कौशल्यांचा तसेच व्होल्टास ब्रँडची सर्वदूर पसरलेली ख्याती, प्रतिष्ठा, देशभरातील विक्री आणि वितरण नेटवर्क याचा उपयोग करून घेतला जाईल.  या कारखान्यामुळे ब्रँडला आपल्या उत्पादन पोर्टफोलिओची भरभराट करण्यास तसेच भारतीय ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी लक्षात घेऊन नवनवीन उत्पादने विकसित करण्यासाठी भरपूर वाव मिळणार आहे.  व्हॉल्यूमच्या दृष्टीने रेफ्रिजरेटर मार्केटमध्ये ८०% व्याप्ती असलेल्या डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर्सचेही उत्पादन याठिकाणी केले जाईल.  २०२५ सालापर्यंत या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता २.५ मिलियन युनिट्स इतकी वाढेल.  या कारखान्यातून प्रामुख्याने भारतीय बाजारपेठांना उत्पादने पुरवली जातील.  त्यासाठी व्होल्टास ब्रँडची लोकप्रियता आणि वितरण क्षमतांचा वापर केला जाईल.  भविष्यात निर्यात संधींबाबत देखील विचार केला जाऊ शकतो.

 यावेळी व्होल्टास लिमिटेडचे चेअरमन श्री. नोएल टाटा यांनी सांगितले, ५ ट्रिलियन यूएस डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असलेल्या भारतीय बाजारपेठेत ग्राहकोपयोगी, घरगुती वापराच्या उत्पादनांसाठी विकास संधी प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत.   

 व्होल्टासच्या मेक इन इंडियाअभियानात भारतात जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधा आणून बाजारपेठेचे नेतृत्व करण्याच्या महत्त्वाकांक्षांचे समर्थन केले गेले आहे.  “व्हाईट गुड्स” उद्योगातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी आणि इनोवेटर बेको आणि भारतातील ग्राहकोपयोगी एअर कंडिशनिंग उद्योगातील मार्केट लीडर व्होल्टास यांची भागीदारी कंपनी व्होल्टबेक होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या या जागतिक दर्जाच्या कारखान्यामुळे आमच्या या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घातले जाईल.

 बेकोची जागतिक पेटंट्स आणि उत्पादन विकास क्षमता तसेच व्होल्टास ब्रँडची ख्याती व वितरण नेटवर्क यांचा लाभ घेऊन भारतीय ग्राहकांना अनोखी, नाविन्यपूर्ण उत्पादने पुरवणे हे आमचे उद्धिष्ट आहे.”   

 कॉक होल्डिंगचे सीईओ लेवेंट काकीरॉग्लू यांनी सांगितले, आज भारतातील आमच्या प्रवासात नवा अध्याय सुरु झाला आहे.  भारतात हे नवीन व्हेंचर सुरु करून आम्ही कॉक ग्रुपच्या जागतिक उद्धिष्टांच्या दिशेने धोरणात्मक पाऊल उचलले आहे.  व्होल्टबेकची स्थापना करताना भारतातील वेगाने विकसित  होत असलेल्या व्हाईट गुड्स बाजारपेठेत आघाडीची कंपनी बनणे हे आमचे महत्त्वाचे उद्धिष्ट होते.  कॉक ग्रुप या नात्याने आमच्या उत्पादन व मार्केटिंग कंपन्या ४६ देशांमध्ये कार्यरत आहेत.  आमच्या कार्यालयांमध्ये एकूण ४८ भाषा बोलल्या जातात आणि आम्ही ३२ वेगवेगळ्या चलनांमध्ये व्यवहार करतो.  जगभरात २३ उत्पादन कारखाने असून नवनवीन गुंतवणूक करत अर्केलिक सातत्याने विस्तार करत आहे.  आमचा जागतिक ब्रँड बेको हा युरोपातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ब्रॅंड्सपैकी एक असून थायलंड आणि भारत या देशांमध्ये गुंतवणूक करून आम्ही आशिया – पॅसिफिक क्षेत्रातही आमचे स्थान मजबूत केले आहे.  टाटा आणि कॉक ग्रुप यांची मूल्ये समान आहेत – सर्वोत्कृष्टता, एकजूट, निष्ठा आणि नैतिकता या मूल्यांचे पालन हे दोन्ही समूह करतात.  आमची एकसमान मूल्ये आणि १८० मिलियन डॉलर्सची अनुमानित गुंतवणूक यांच्या बळावर नजीकच्या भविष्यकाळात व्होल्टबेक हा एक आघाडीचा ब्रँड म्हणून खूप प्रसिद्ध होईल याची आम्हाला खात्री आहे.”

 व्होल्टास लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. प्रदीप बक्षी यांनी सांगितले, २०१८ मध्ये सुरुवात झाल्यापासून व्होल्टास बेकोने देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या कन्ज्युमर ब्रँड्सपैकी एक म्हणून स्थान मिळवले आहे.  यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत या ब्रँडची विक्री अर्धा मिलियन युनिट्स इतकी नोंदवली जाईल अशी अपेक्षा आहे.  वॉशिंग मशीन्स व रेफ्रिजरेटर या दोन विभागांमध्ये या ब्रॅंडने आधीच लक्षणीय ओळख निर्माण केली असून डिशवॉशर्समध्ये देखील हा ब्रँड आघाडीवर आहे.  आम्हाला खात्री आहे की  सानंद येथील नवीन कारखान्यामुळे भारतात २०२५ सालापर्यंत घरगुती उपकरणांची आघाडीची कंपनी म्हणून अशी आमची ओळख प्रस्थापित झालेली असेल.”

 अर्केलिकचे सीईओ हकन बुलगुरलू यांनी सांगितले,भारतात विकास संधी विपुल प्रमाणात आहेत आणि या देशाच्या यशोगाथेत सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.  आघाडीची कंपनी बनून पुढील दशकात भारतातील व्हाईट गुड्स बाजारपेठेत दोन अंकी मार्केट शेअर मिळवण्याचे आमचे उद्धिष्ट आहे.  आम्ही असे मानतो की आमच्या या नवीन कारखान्यामुळे ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यात मोठा हातभार लागेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ते खूप मोठे योगदान ठरेल.  बेको ही घरगुती उपकरणे उद्योगातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी असून आमची जागतिक नैपुण्ये आणि खास तयार करण्यात आलेले अभिनव तंत्रज्ञान यांच्या बळावर आम्ही भारतीय ग्राहकांच्या आशाअपेक्षा नक्कीच पूर्ण करू शकू.”

 उद्योगक्षेत्रातील आकडेवारीनुसार भारतात ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत दरवर्षी १० ते १२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.  गेल्या दहा वर्षात जागतिक स्तरावर व्हाईट गुड्स बाजारपेठेची एकंदरीत वाढ ३% होती तर भारतातील महत्त्वाच्या घरगुती उपकरणांच्या बाजारपेठेत त्यापेक्षा खूप जास्त जवळपास ९ टक्क्यांची वाढ झाली.  पायाभूत सोयीसुविधा आणि मॅक्रोइकॉनॉमिक विकासामुळे येत्या काही वर्षात खूप चांगली प्रगती होईल, २०२५ सालापर्यंत बाजारपेठेत लक्षणीय हिस्सा मिळवण्यात यश येईल आणि देशात ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेतील आघाडीची कंपनी बनू असा विश्वास या ब्रँडला वाटतो.  सानंद फॅक्टरी सुरु झाल्यामुळे व्होल्टास बेको ब्रँडकडून परवडण्याजोगी, सहज विकत घेता येतील आणि उच्च दर्जाची ग्राहकोपयोगी उत्पादने उपलब्ध करवून देणे आणि ग्राहकसंख्येत वाढ घडवून आणणे हा या ब्रँडचा उद्देश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...