सिस्‍कातर्फे घरगुती उपकरणांना स्‍मार्ट बनवण्‍यासाठी वाय-फाय सक्षम स्‍मार्ट प्‍लग्‍स सादर

Date:

मुंबई, सिस्‍का ग्रुप या तंत्रज्ञानामधील सर्वोत्तम इनोव्‍हेशन्‍स सादर करणा-या आघाडीच्‍या एफएमईजी ब्रॅण्‍डने स्‍मार्ट वाय-फाय प्‍लगच्‍या सादरीकरणाची घोषणा केली आहे. मोठ्या व लहान ते मध्‍यम आकाराच्‍या घरगुती उपकरणांसाठी त्‍यांच्‍या स्‍मार्ट होम विभागांतर्गत पॉवर मीटर १६ए आणि स्‍मार्ट मिनी प्‍लग १०ए हे प्‍लग्‍स सादर करण्‍यात आले आहेत. ऑक्‍टोबर २०१८ मध्‍ये स्‍मार्ट होम विभागामध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर सिस्‍का कंपनी आपल्‍या वाढत्‍या ग्राहकवर्गाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सर्वोत्तम, तसेच परवडणारी स्‍मार्ट होम उत्‍पादने सादर करण्‍यामध्‍ये अग्रेसर राहिली आहे.

सादर करण्‍यात आलेले दोन्‍ही नवीन प्‍लग्‍स अॅलेक्‍सा व गुगल असिस्‍टण्‍ट सारख्‍या वॉइस असिस्‍टण्‍ट्सशी सुसंगत आहेत आणि सिस्‍का स्‍मार्ट होम अॅपच्‍या माध्‍यमातून दूरूनच नियंत्रित करता येऊ शकतात. या दोन्‍ही प्‍लग्‍सची किंमत अनुक्रमे ४,१९०/- रूपये आणि २,५९९/- रूपये आहे. दोन्‍ही स्‍मार्ट प्‍लग्‍स खरेदीसाठी प्रमुख ऑनलाइन व रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहेत. 

या सादरीकरणाबाबत बोलताना सिस्‍का ग्रुपचे कार्यकारी संचालक श्री. गुरूमुख उत्तमचंदानी म्‍हणाले, ”स्‍मार्ट होम तंत्रज्ञान झपाट्याने वापरण्‍यास सुलभ व किफायतशीर बनत असल्‍यामुळे भारतीय ग्राहकांमध्‍ये स्‍मार्ट होम उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍सचा अवलंब करण्‍याचे प्रमाण देखील वाढले आहे. सिस्‍का बाजारपेठेमध्‍ये भविष्‍यात उत्तम प्रकाशयोजना देणारी तंत्रज्ञान-सक्षम, नाविन्‍यपूर्ण व अनोखी स्‍मार्ट होम उत्‍पादने सादर करण्‍याचा मनसुबा ठेवते. सिस्‍का स्‍मार्ट वाय-फाय प्‍लग्‍सच्‍या लाँचसह आम्‍ही आमच्‍या स्‍मार्ट होम पोर्टफोलिओमध्‍ये अधिक नवीन उत्‍पादनांची भर केली आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ही उत्‍पादने देशभरातील लाखो ग्राहकांना पैशांचे मोल व आरामदायी सुविधा देतील.

स्‍मार्ट होम डिवाईसेस आपले स्‍पीकर्स, रेफ्रिजेरेटर्स, जुने लाइट बल्‍ब्‍स अशा अनेक उपकरणांची जागा घेत आहेत. पण आपल्‍या घरांमध्‍ये अजूनही स्‍मार्ट न बनलेल्‍या उपकरणांबाबत काय? सिस्‍का स्‍मार्ट प्‍लग्‍ससह घरातील उपकरणांना स्‍मार्टर बनवा. २०२० पर्यंत स्‍मार्ट होम विभाग झपाट्याने विकसित होण्‍याची अपेक्षा आहे. तसेच हा विभाग २०२२ पर्यंत ७.२ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचण्‍याची देखील अपेक्षा आहे. म्‍हणजेच अनेक नवीन ग्राहक या विभागामध्‍ये प्रवेश करतील. सुधारित जीवनशैली आणि खर्च करण्‍याजोग्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ अशा घटकांमुळे देशामध्‍ये स्‍मार्ट होम उत्‍पादनांसाठी मागणीमध्‍ये वाढ झाली आहे.

सिस्‍का स्‍मार्ट वाय-फाय प्‍लग्‍सची प्रमुख वैशिष्‍ट्ये –

१. वॉइस कंट्रोल – सिस्‍का स्‍मार्ट प्‍लग आणि स्‍मार्ट मिनी प्‍लगसह तुम्‍ही अॅलेक्‍सा व गुगल असिस्‍टण्‍ट सारख्‍या वॉइस असिस्‍टण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून घर व कार्यालयातील उपकरणांवर कोणत्‍याही    कोप-यामधून नियंत्रण ठेवू शकता. तुम्‍ही या प्‍लगशी जोडण्‍यात आलेल्‍या डिवाईसेसना ऑन/ऑफ करू शकता, शेड्यूल्‍स व टाइमर्स सेट करू शकता.

२.शेड्यूलिंग, टाइमर्स आणि रूम अलोकेशन – सिस्‍का स्‍मार्ट प्‍लग आणि स्‍मार्ट मिनी प्‍लग तुम्‍हाला तुमच्‍या उपकरणांना निर्धारित कालावधीमध्‍ये ऑन/ऑफ करण्‍यामध्‍ये मदत करतात. तुम्‍ही किचन, बेडरूम आणि लिव्हिंग रूम अशा खोलीच्‍या भागांमध्‍ये देखील या प्‍लगच्‍या कार्यसंचालनांवर नियंत्रण ठेवू शकता.

३. युनिव्‍हर्सल प्‍लग पिन टाइप – सिस्‍का स्‍मार्ट वाय-फाय प्‍लगसह पॉवर मीटर व स्‍मार्ट मिनी प्‍लगमध्‍ये युनिव्‍हर्सल प्‍लग-इन टाइप आहे. ज्‍यामुळे तुम्‍ही आता कुठेही प्‍लग घेऊन जाऊ शकता आणि तुम्‍हाला योग्‍य प्‍लग शोधण्‍याचा त्रास सहन करावा लागणार नाही. कोणत्‍याही हबच्‍या गरजेशिवाय विद्यमान वाय-फायशी प्‍लगला कनेक्‍ट करा.

४.ओव्‍हरहिटींगपासून संरक्षण – अधिक काळासाठी वापर केल्‍यास प्‍लग्‍समध्‍ये ओव्‍हरहिटींची सामान्‍य समस्‍या दिसून येते. पण सिस्‍का स्‍मार्ट प्‍लग्‍स प्रगत तंत्रज्ञानासह बनवण्‍यात आले आहेत. हे तंत्रज्ञान तुमच्‍या डिवाईसचे ओव्‍हरहिटींगपासून संरक्षण करते.

५.ऊर्जा वापरावर देखरेख ठेवा – सिस्‍का स्‍मार्ट वाय-फाय प्‍लग आणि स्‍मार्ट मिनी प्‍लग सिस्‍का स्‍मार्ट होम अॅपच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक उपकरणाच्‍या ऊर्जावापराची माहिती देतात. ज्‍यामुळे तुम्‍ही प्रत्‍येक ऊर्जा वापरावर नियंत्रणासोबत देखरेख ठेवू शकता.

६.सीन्‍स व ऑटोमेशन – सिरीसह तुमचे शेड्यूल्‍स व नित्‍यक्रम ठरवण्‍यासाठी सिस्‍का स्‍मार्ट प्‍लग आणि स्‍मार्ट मिनी प्‍लगमध्‍ये डिवाईसेसना कनेक्‍ट करा. तुम्‍ही पाऊस, सूर्योदय व सूर्यास्‍त अशा विशिष्‍ट स्थितींच्‍या माहितीसह ऑन/ऑफ

७.चाइल्‍ड सेफ्टी शटर – सिस्‍का स्‍मार्ट प्‍लग्‍समध्‍ये कार्यक्षम चाइल्‍ड सेफ्टी शटर आहे, ज्‍यामुळे तुमच्‍या मुलांचे इलेक्ट्रिक आऊटलेटशी संपर्क होण्‍यापासून प्रतिबंध होते.

८.उपकरणांशी सुसंगत – पॉवर मीटर १६ए असलेला सिस्‍का स्‍मार्ट वाय-फाय प्‍लग मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍स, एअर कंडिशनर्स अशा मोठ्या उपकरणांशी सुसंगतपणे काम करतो. ज्‍यामुळे ही उपकरणे स्‍मार्टर बनतात. तसेच सिस्‍का स्‍मार्ट मिनी प्‍लग १०ए टेलिव्हिजन्‍स, मोबाइल्‍स, लॅम्‍प्‍स अशा लहान व मध्‍यम आकाराच्‍या उपकरणांसाठी उत्तम काम करतो.

 

सिस्‍का बाबत – गुरू नानक मार्केटिंगसह सुरूवात केलेली कंपनी महाराष्‍ट्रासाठी टी-सिरीज ऑडिओ कॅसेट्स, सीडी आणि ऑडिओ व्हिडिओ सिस्टिम्‍सच्‍या वितरण व्‍यवसायामध्‍ये सामील होती. सिस्‍का ग्रुपने फक्‍त एकाच गोष्‍टीकडे लक्ष केंद्रित केले, ते म्‍हणजे विकास. सिस्‍का ग्रुपने विकास करणे आणि स्‍थानिक अग्रणी कंपनी बनणे सुरूच ठेवले आहे. आता त्‍यांचे लक्ष जगभरातील देशांमध्‍ये उपस्थिती वाढवण्‍यावर आहे. प्रबळ दृष्टीकोन व चालनेमधून सक्षम झालेला सिस्‍का ग्रुप एलईडी, पसर्नल केअर अप्‍लायन्‍सेस, मोबाइल अॅक्‍सेसरीज, होम अप्‍लायन्‍सेस अशा अधिक विभागांमध्‍ये विकसित झाला. सिस्‍का ग्रुप विकसित होण्‍यासह या बाजारपेठांवर प्रभुत्‍व गाजवत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...