रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२८वी जयंतीनिमित रयत शिक्षण संस्थेच्यावतीने स्वारगेटजवळील होल्गा चौकातील त्यांच्या पुतळ्यास महापौर दत्ता धनकवडे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कांडगे , नगरसेवक चेतन तुपे , स्थानिक नगरसेवक अशोक हरणावळ , पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर , पथारी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष मनोहर परदेशी , विभागीय अधिकारी चंद्रकांत जाधव , डॉ. अरविंद बुरुंगले , सहाय्यक विभागीय अधिकारी अशोक जगदाळे , किसन रत्नपारखी , प्रा. संजय मोहिते , डॉ. मंजूताई बोबडे , प्रा. पुष्पाताई देशमुख , मुख्याध्यापक संजय देवडे , शामराव वंडकर , माजी निरीषक एम. पी. संकुंडे आदी मान्यवर व विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले कि , कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची दरवाजे खुली करून दिली , त्यामुळे ज्ञानाच्या गंगेमध्ये सर्वांनी शिक्षण घेतल्यामुळे आज रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकत आहेत . त्यामुळे कर्मवीरांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे . कर्मवीरांच्या पुतळ्यास विविध संस्था , संघटना व रयतच्या शाखा यांनी अभिवादन केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले .