पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या निवडणूक प्रचारासाठी
कॉंग्रेस भवनमध्ये पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
झाली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, हाजी नदाफ , नगरसेविका
लता राजगुरू , नगरसेविका लक्ष्मी घोडके , नगरसेवक अविनाश बागवे , माजी उपमहापौर प्रकाश मंत्री , मौलाना
काझ्मी , शिक्षण मंडळ उपाध्यक्ष व भवानी ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नुरुद्दीन सोमजी ,पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे
माजी नगरसेवक शैलेश बिडकर , संगीता पवार , प्रसाद केदारी , करण मकवानी , मंजूर शेख , पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी
उपाध्यक्ष विनोद मथुरावाला , स्थायी समिती माजी अध्यक्ष रशीद शेख ,अनिस सुंडके , माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे ,
शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर , जया
किराड , सरचिटणीस विठ्ठल थोरात , वाल्मिक जगताप , रफिक शेख , झोपडपट्टी सेलच्या महिला अध्यक्षा सुरेखा
खंडागळे , भगवान धुमाळ , सुजित यादव , राजेश शिंदे , राजाभाऊ चव्हाण , बबलू सय्यद , स्मिता मुळीक व कॉंग्रेस
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी , सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी कार्यकर्त्यांना
मार्गदर्शन करताना सांगितले कि , प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला पाहिजे ,
कॉंग्रेस पक्षाने केलेली विकासकामे हि मतदारांना समजावून सांगितले पाहिजेत . आपण केलेल्या विकासकामांवर
प्रचारामध्ये आपण सर्वांनी भर दिला पाहिजे .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस पक्षाचे प्रचारप्रमुख व बैठकीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी
सांगितले कि , कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला पक्षाचा उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करावा , त्यासाठी
कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराचा रोजच्या रोज आढावा दयावा, आणि मुख्य निवडणुक कचेरीत रोज
संपर्क साधावा. सर्वांनी नियोजनबद्ध आणि एकदिलाने काम केले पाहिजे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात
सांगितले .
प्रचाराच्या नियोजनासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली . या समितीमध्ये विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे ,
नगरसेवक सुधीर जानजोत , माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख , अनिस सुंडके , पुणे महानगरपालिका आणि पुणे
कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्यांची नियुक्ती करण्यात आली .
या बैठकीत या बैठकीचे सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले .कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रमेश बागवे यांना जास्तीत जास्त
मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला