ज्योतिषशास्त्र तारक की मारक? ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास ठेवावा? अशा एक न अनेक प्रश्नांवर परखड भाष्य करनारं “जमलं बुवा एकदाचं” या नाटकाची निर्मिती सिड एंटरटेनमेंटची आहे. ‘यु टर्न’, ‘मदर्स डे’, ‘सुनेच्या राशीला सासू’ या नाटकांना प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर लेखक आनंद म्हसवडकरांनी हे चौथ नाटक घेऊन येत आहेत. एकाच लेखकाचं एकाचवेळी विविध रंगमंचावर सादर होणारं हे चौथं नाटक आहे.
या नाटकातील कथा वखारकर या सुशिक्षित कुटुंबाची आहे. एक लेखक, एक दिग्दर्शक, एक प्रसिध्द फोटोग्राफर आणि एक नेता अशी चार मुलं आणि त्यांचा ज्योतिषी मामा यावर आधारित हे कथानक आहे. ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन किंबहुना त्याची भिती दाखवून सामान्य माणसांना ज्योतिषी कशाप्रकारे भिती दाखवत असतात त्याचबरोबर याच अतिरेकीपणामुळे या सर्व मुलांचे मन परिवर्तन कशापध्दतीने होते याची अचुक मांडणी या नाटकात करण्यात आली आहे. भविष्य जर खरि ठरत असती तर जगभरात घडणारे मोठे अनर्थ टाळता आले असते. या मताचा दयानंद वखारकर हा मुलगा जेंव्हा या मामाच्या अतिरेकिपणामुळे घर सोडून जातो आणि नंतर मामाने वर्तविलेलं भविष्य खोटं सिद्ध करतो. या सर्व गोष्टींची अचुक मांडणी लेखक आनंद म्हसवडकर यांनी केलीये. तर या नाटकाचं दिग्दर्शन हेमांगी काळे यांनी केले आहे. सिड एंटरटेनमेंटने या नाटकाची निर्मिती केली आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.
यावेळी दिग्दर्शक हेमांगी काळे म्हणाल्या कि, नाटक आणि नृत्य क्षेत्रात पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर दिग्दर्शन क्षेत्रात येण्याचा मान “जमलं बुवा एकदाचं”च्या माध्यमातून मिळाल्याचा आनंद होत आहे. या नाटकातून आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. ज्योतीषशास्त्राविरुध्द डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लढा दिला त्यानंतर अशा थोर व्यक्तीला अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत असताना हौतात्म्य मिळालं. या नाटकाद्वारे आम्ही त्यांचा अंधश्रद्धा निर्मुलनाचा लढा पुढे चालूच ठेवणार आहोत.
“जमलं बुवा एकदाचं” या नाटकाची रंगीत तालीम व पत्रकार परिषद पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सुरु आहे. यावेळी दिग्दर्शक हेमांगी काळे, निर्माते सतिश लालबिगे तसेच कलाकार उपस्थित होते.
“जमलं बुवा एकदाचं”
निर्मिती – सिड प्रोडक्शन
मुळ कथा / लेखक – आनंद म्हसवेकर
दिग्दर्शक – हेमांगी काळे
नेपथ्थ- संदिप देशमुख
प्रकाश योजना – प्रशांत निकम
कलावंत – आदर्श गायकवाड, मंगलदास माने, सागर पवार, संदिप सोमण, महेंद्र चव्हाण, चेतन गरुड, हेमांगी काळे, उज्वला गौड, आश्विनी आव्हाड.