मुंबई, – अभिनेता रणबीर कपूरकने एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता त्याचे वडील व अभिनेता ऋषी कपूर यांनीही आता . ‘आत्तापर्यंत झालेले सर्व वाद आणि आंदोलनांनंतर एफटीआयआयचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी स्वेच्छेने पद सोडावे’ असा सल्ला ऋषी कपूर यांनी दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.तर दुसरीकडे कितीही टीका झाली तरी त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम होणार नसून फिल्म इन्स्टिट्युटचं अध्यक्षपद सोडणार नसल्याचे गजेंद्र चौहान यांनी स्पष्ट केले आहे.तर अनुपमखेरयांनीआपणगजेंद्रप्रकरणातकाहीचबोलणारनसल्याचेम्हटलेआहे
ऋषी कपूर यांनी म्हटले आहे कि , ‘सध्या सुरू असलेली आंदोलने व एकूण वाद पाहता गजेंद्र चौहान यांनी स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला मला द्यावासा वाटतो. जर विद्यार्थी तुम्हाला नको म्हणत असतील तर राजीनामा देऊन पद सोडणेच संयुक्तिक ठरेल. अध्यक्षपदासाठी तुमच्याच नावाचा आग्रह कायम ठेवून काहीच होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानाने पद सोडावे’ असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरने एफटीआयआय्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला होता. ‘विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशीच व्यक्ती अध्यक्षपदी नेमावी’ असे मत त्याने व्यक्त केले होते.