Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

१५३ विद्यार्थ्यांना मिळाले ‘ऑफर लेटर’ तसेच २५९ विद्यार्थी शॉर्टलिस्टमध्ये

Date:

unnamed1
पुणे,  : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘जॉब फ़ेअर’चे आयोजन करण्यात आले.  सूर्यदत्ता व्यतिरिक्त पुण्यातील व महाराष्ट्रातील  इतर शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनादेखील जॉब फ़ेअरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये एकूण १७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच २५९ विद्यार्थी शॉर्टलिस्ट करण्यात आले व त्यातील १५३ विद्यार्थ्यांना लगेच ऑफर लेटरही देण्यात आले.
” विद्यार्थ्यांचा तसेच काही कंपन्यांचा ‘जॉब फ़ेअर’ ला भरगोस प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी जास्तीतजास्त नोकरीच्या संधी मिळवून देण्याचा आमचा मानस होता. तसेच आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनाही बाहेरील विद्यार्थ्यांशी स्पर्धा असल्याची मानसिकता तयार झाली व हीच गोष्ट त्यांना मोठी शिकवण देणारी ठरली असावी. अजूनही काही कंपन्या काही विद्यर्थ्यांना शॉर्टलिस्ट करीत आहेत. ” असे सूर्यदत्ता संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
टेक महिंद्रा, रिलायंन्स, एक्सिस सिक्युरीटी , डॉ. रेड्डी फाउंडेशन, मोफाई रँडस्टॅड, थायरोकेअर टेक्नोलोजी , सिंटेल टेलीकॉम  तसेच अशा एकूण ३२ कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांनी या कॅम्पस सिलेक्शन मध्ये आपला सहभाग नोंदविला. बीबीए, बीएससी, बी. कॉम, बीसीए अशा पदवीधर व एमबीए, एमसीए. एम.कॉम, एमएससी अशा पदव्युत्तर पदवीधर तसेच डीप्लोमा व पीजी डीप्लोमा आणि काही बारावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘जॉब फ़ेअर’द्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या गेल्या.
‘जॉब फ़ेअर’चे उद्घाटन सूर्यदत्ता संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, प्लेसमेंट समन्वयक नेहा इनामदार, ‘जॉब फ़ेअर’ चे समन्वयक रवींद्र कंग्राळकर व बावधनचे माजी सरपंच किरण दगडे यांनी केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...