‘हायवे’चा फर्स्ट लुक, ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

Date:

1 2 3

– ‘‘मुंबईची ‘धाव’आणि पुण्याची ‘चाल’यांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस ‘हायवे. मुंबई – पुण्याहून वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळी माणसे निघतात आणि हायवेवरील वाहने पळू लागतात… ’या एवढ्याशा ‘वनलाईन’ला घेऊन सध्याची ‘स्टार’लेखक – दिग्दर्शक जोडगोळी गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी एक विचार करायला लावणारी, तरीही मनोरंजन करणारी चित्रकथा रंगवली आहे. उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या “आरभाट कलाकृती” आणि “खरपूस फिल्म्स” कृत ‘हायवे’हा नवा मराठी चित्रपट येत्या २४ जुलैला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

‘हायवे’चा फर्स्ट लुक, ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा एका अनोख्या पद्धतीने संपन्न झाला. या सोहळ्याला जणू अख्खं तारांगणचं लोटलं होतं. चित्रपटात असलेली भलीमोठ्ठी स्टारकास्ट तर उपस्थित होतीच पण पाहुण्या कलावंतांचीही विशेष हजेरी लाभल्याने हा सोहळा विशेष ठरला. चित्रपटाचा फर्स्ट लुक जेष्ठ नाटककार अभिनेते पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. हायवेच्या निमित्ताने बॉलीवूड मधील लोकप्रिय संगीतकार अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताचे प्रकाशन सुपरस्टार संगीतकार अजय – अतुल यांच्या हस्ते करण्यात आले तर ट्रेलर लॉंचसाठी जेष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, एव्हरेस्टचे संजय छाब्रिया, झी मराठीचे दीपक राजाध्यक्ष यांना आमंत्रित केले होते.

‘माणूस प्रवासाने घडतो आणि माणूस प्रवासातच कळतो… मग तो प्रवास जीवनाचा असो किंवा ‘हायवे’वरचा. या भन्नाट कल्पनेभोवती गिरीश – उमेश कुलकर्णी यांनी ही चित्रकथा रंगवली आहे. ‘चेहरे’टिपण्यात माहीर असलेल्या या लेखक – दिग्दर्शक जोडगोळीने माणसांचा ‘हायवे’वरचा प्रवास मांडताना रसिकांना एक वेगळा, नवा आणि तजेलदार अनुभव दिला आहे. वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरामधली माणसं आपापल्या भावभावनांच, प्रश्नाचं वेदनांच, बॅगेज घेऊन प्रवासाला निघतात आणि मग…? हा त्यांच्या प्रवासातील ‘पॉझ’त्या प्रत्येक प्रवाशाचा ‘चेहरा’उघड करतो. एकूणच हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाचा, नव्या जमान्याचा ‘एक सेल्फी आरपार’ असेच म्हणता येईल.

सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’पुरस्कार विजेत्या ‘देऊळ’नंतर गिरीश – उमेश कुलकर्णी या दोघांचा हा आणखी एक नवा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा भन्नाट चित्रपट आहे. आतापर्यंत सलग चार चित्रपटांसाठी या दोघांनी लेखक-दिग्दर्शक म्हणून काम केले असून त्यांच्या ‘आरभाट कलाकृती’ची ही सहावी निर्मिती आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक – दिग्दर्शक म्हणून गिरीश-उमेश यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. तर पोस्टकार्ड आणि अनुमती या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटांचे निर्माते विनय गानू यांची ‘हायवे’ च्या निर्मितीसाठी विशेष साथ लाभली आहे.

‘हायवे’मध्ये प्रमुख भूमिकेत गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सतीश आळेकर, किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे, नंदकिशोर चौघुले, विद्याधर जोशी, मयुर खांडगे, श्रीकांत यादव, उमेश जगताप, शुभम, शकुंतला नगरकर, पूर्णानंद वांदेकर, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र गायकवाड, सविता प्रभुणे, मकरंद सप्तर्षी, धीरेश जोशी, ओम भूतकर, पूर्वा पवार, शिवकांता औरंगाबादकर, शशांक शेंडे, शिल्पा अनासपुरे, जयंत गाडेकर, आदित्य कुलकर्णी, उर्मिला निंबाळकर, भूषण मंजुळे, शंकर डोंगरे, सहर्ष शुक्ला यांच्या सोबतच प्रथम पदार्पण करणारे समीर भाटे आणि वृषाली कुलकर्णी हे आपली वेगळी छाप सोडून जातात.

उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विनय गानू यांच्या आरभाट कलाकृती आणि खरपूस फिल्मस् कृत ‘हायवे’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुधाकर रेड्डी यांनी केले आहे. वैभव जोशी यांच्या गीताला संगीतकार अमित त्रिवेदी यांचे संगीत आहे. पार्श्वसंगीताचा भार मंगेश धाकडे यांनी उचलला असून ध्वनी संयोजन साऊंड डिझायनर अंथोनी रुबेन यांचे आहे. ‘हायवे’चे संकलन परेश कामदार यांनी केले असून कॉस्च्युम डिझायनर म्हणून सीमा आरोळकर यांनी काम पाहिले आहे. कला दिग्दर्शन प्रशांत बिडकर यांचे असून वेशभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे तर कार्यकारी निर्माते नितीन प्रकाश वैद्य आहेत. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...