Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संगमवाड़ी ते विश्रांतवाड़ी बीआरटी बससेवेचा शुभारंभ;मोफत योजनेचा फेरविचार करा -अजितदादा

Date:

1 3 4 11052036_10153273451857655_5261247800965041290_n 11058627_10153273444847655_6277876591806852904_n 11230855_10153273483072655_9200475153542080581_n

पुणे – “”रेनबो बीआरटीचा प्रवास महिनाभर मोफत दिल्याने महापालिकेला आर्थिक बोजा सहन करावा लागणार असून, त्याचा बारकाईने अभ्यास करून योजनेचा फेरविचार करावा,‘‘ अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी महापालिकेला केली. विश्रांतवाडी चौकातील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. पुणे महानगरपालिकेतर्फ आयोजित “हिंजेवाड़ी ते लोहगांव विमानतळ व कोथरूड ते लोहगाव विमानतळ वातानुकूलित नवीन बससेवेचा तसेच
संगमवाड़ी ते विश्रांतवाड़ी बीआरटी बससेवेचा शुभारंभ श्री.अजितदादा पवार, विधिमंडळ पक्षनेता, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांच्ये हस्ते संपन्न झला.
येरवडा आळंदी रस्ता येथील बॉम्बे सौपर्स, चंद्रमा हॉटेलच्या नजीकच्या डेक्कन कॉलेज बीआरटीएस बस थांब्याचे उदघाटन केल्यानंतर बीआरटीएस बसमधून सर्व उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला.
बसमार्गावरील फुलेनगर येथील भारतरत्न मौलाना अब्दुलकलाम आझाद पादचारी उड्डाणपूलाची पाहणी करण्यात आली, व योजनेच्या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकारी तसेच मा. महापौर दत्तात्रय धनकवड़े यांच्याशी चर्चा केली.
याप्रसंगी सौ.शकुंतला धराडे(महापौर, पिं.चिं.मनपा), सभागृह नेते शंकर केमसे,  विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, डॉ.सिद्धार्थ धेंड़े,  सुनिल गोगले, विजय देशमुख, संजय भोसले, .डॉ.विश्वजीत कदम, सौ.मिनल सरवदे, दत्तात्रय गायकवाड, .मुकरी अलगुडे, अभिषेक कृष्णा,.ओमप्रकाश बकोरिया,राजीव जाधव, श्रीमती मयूरा शिंदेकर, . सुनील बुरसे, . विवेक खरवडकर, ज्ञानेश्वर मोळक, शाम ढवळे व अन्य अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“एसी‘ बस सेवाही सुरू 
लोहगाव विमानतळ-हिंजवडी आणि लोहगाव विमानतळ ते कोथरूड या वातानुकूलित (एसी) बस सेवेचेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. उद्‌घाटनानंतर लगेचच या दोन्ही मार्गांवर बससेवा सुरू झाली. ही सेवा “ऍप‘वर आधारित असून, बसमध्ये “सीसीटीव्ही‘ कॅमेरा, एलसीडीची सुविधा आहे. विशेषतः लोहगाव विमानतळावरील विमानांचे वेळापत्रकही दाखविण्याची व्यवस्था केली आहे. कोथरूडसाठी 120 रुपये, तर हिंजवडीसाठी 180 रुपये तिकीट दर आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे-साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११...

PMPML बसने चांदणी चौकात ६ खाजगी वाहनांना उडविले , ,PMPML आणि RTOबद्दल संताप,नागरिकांची चिंता आणि सुरक्षेचा प्रश्न

चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांतदादा सरसावले-जखमींवर उपचाराचा सर्व खर्च...

“पुण्यनगरीत सलोख्याचे दर्शन घडवत मंगल कलश रथयात्रेचे जल्लोषात स्वागत”

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे...