रमेश बागवे,विनायक निम्हण,रोहित टिळक,संग्राम थोपटे,हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारीजाहीर

Date:

उमेदवारी वाटपात काँग्रेस ची बाजी
मुंबई – महायुती आणि आघाडीमधील जागावाटपाचा घोळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तोडग्याची वाट न पाहता ११८ उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने आघाडी घेतली.पुण्यातील ;पुणे कॅन्टोन्मेंट : रमेश बागवे,शिवाजीनगर : विनायक निम्हण,कसबा पेठ : रोहित टिळक,भोर : संग्राम थोपटे आणि इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे . सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होणार की नाही, याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा आपल्या ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढवला असून अद्यापही १७0 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नसल्याने राष्ट्रवादीसाठी तडजोडीचे दरवाजे खुले ठेवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसने या पहिल्या यादीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड), उद्योगमंत्री नारायण राणे (कुडाळ), पतंगराव कदम (पळूस-कडेगाव), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), अमित देशमुख (लातूर शहर), सदाशिवराव पाटील (खानापूर), मदन पाटील (सांगली), अशोक निलंगेकर (निलंगा), महेश गणगणे (अकोट), जयवंत आवळे (हातकणंगले), सा.रे. पाटील (शिरोळ) यांच्यासह काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या अशक्य अटींमुळे आघाडी अशक्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता धूसर वाटत होती. काँग्रेस आघाडीमध्ये बुधवारपर्यंत जागावाटपाचा तिढा चालूच होता. राष्ट्रवादी काँग्रेसला १४४ जागा हव्या होत्या. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव मान्य नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली होती. राष्ट्रवादीनेही सुरुवातीला स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद देऊन काँग्रेसला एक दिवसाची मुदत दिली होती. मात्र काँग्रेसने राष्ट्रवादीच्या १४४ जागांच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नव्हता.
उमेदवार पुढील प्रमाणे –
कृष्णा हेगडे (विलेपार्ले), नसीम खान (चांदीवली), प्रवीण छेडा (घाटकोपर पूर्व), चंद्रकांत हांडोरे (चेंबुर), कृपाशंकर सिंग (कालिना), बाबा सिद्दीकी (वाद्रे पूर्व), श्रीमती वर्षा गायकवाड (धारावी), जगन्नाथ शेट्टी (सायन कोळीवाडा), कालीदास कोळमकर (वडाळा), मधुकर चव्हाण(भायखळा), अँड़ सुशीबेन शहा (मलबार हिल), अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती अँनी शेखर (कुलाबा), महेंद्र घरट (उरण), रविंद्र पाटील (पेण), मधुकर ठाकुर (अलिबाग), हर्षवर्धन पाटील (इंदापुर), संग्राम थोपटे (भोर), विनायक निम्हण (पुणे – शिवाजीनगर), रमेश बागवे (पुणे कॅन्टोनमेंट), रोहित टिळक (कसबापेठ), बाळासाहेब थोरात (संगमनेर), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपुर), सत्यजीत तांबे पाटील (अहमदनगर शहर), त्रिंबक भिसे (लातूर ग्रामीण), अमित देशमुख (लातूर शहर), अशोक पाटील निलंगेकर (निलंगा), बसवराज पाटील (औसा), किसन कांबळे (उमरगा), मधुकरराव चव्हाण (तुळजापुर), विश्‍वनाथ चाकोते (सोलापूर शहर उत्तर), कु. प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), सिद्धराम म्हेत्रे (अक्कलकोट), दिलीप माने (सोलापूर दक्षिण), मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), राजेंद्र देसाई (राजापुर), नारायण राणे (कुडाळ), सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण), पी. एन. पाटील (करवीर), सत्यजीत कदम (कोल्हापूर उत्तर), जयंत आवळे (हातकणंगले), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), अप्पासाहेब एस. आर. पाटील (शिरोळ), मदन पाटील (सांगली), डॉ. पतंगराव कदम (पलुस-केडगाव), सदाशीवराव पाटील (खानापुर). के. सी. पडवी (अक्कलकुवा), पद्माकर वळवी (शहादा), स्वरूपसिंग नाईक (नवाबपुर), धनाजी अहिरे (साक्री), शामकांत सनेर (सिंदखेडा), काशीराम पावरा (शिरपूर), शिरीष चौधरी (रावेर), जोत्स्ना विसपुते (जामनेर), हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), राहुल बोंद्रे (चिखली), दिलीपकुमार सानंदा (खामगाव), महेश गंगणे (अकोट), सय्यद नतीकोद्दीन खतीब (बाळापुर), अमित झनक(रिसोड) विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), यशोमती ठाकुर (तिवसा), केवलराम काळे (मेळघाट), अनिरुद्ध देशमुख (अचलपुर), अमर काळे (आर्वी), रणजित कांबळे (देवळी), सुनील केदार (सावनेर), प्रफुल्ल गुडदे (नागपुर दक्षिण-पश्‍चिम), सतिष चतरुवेदी (नागपुर दक्षीण), अभिजीत वंजारी (नागपुर पुर्व), डॉ. अनेश माजीद अहेमद (नागपुर मध्य), विकास ठाकरे (नागपूर पश्‍चिम), डॉ. नितीन राऊत (नागपुर उत्तर), सुबोध मोहिते (रामटेक), प्रमोद तितीरमारे (तुमसर), सेवक वाघे (साकोळी), गोपालदास अग्रवाल (गोंदिया), रामरतनबापु राऊत (आमगाव), आनंदराव गेडाम (आरमोरी), सगुणा ताळंदी (गडचिरोली), सुभाष धोटे (राजुरा), विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी), अविनाश वारजुरकर (चिमुर), वामनराव कासावार (वणी), प्रो. वसंत पुरके (राळेगाव), विजयराव खडसे (उमरखेड), महादेवराव पवार (हादगाव), डी. पी. सावंत (नांदेड उत्त्तर), ओमप्रकाश पोकर्णा (नांदेड दक्षीण), रावसाहेब अंतापुरकर (देगलुर), हनुमंतराव पाटील (मुखेड), संतोष तर्फे (कळमनुरी), भाऊराव पाटील (हिंगोली), रामप्रसाद बोर्डीकर (जिंतुर), कैलास गोरंट्याल (जालना), अब्दुल सत्तार (सिल्लोड), कल्याण काळे (फुलंब्री), जितेंद्र देहाडे (औरंगाबाद पश्‍चिम), डॉ. राजेंद्र दर्डा (औरंगाबाद पुर्व), डॉ. दिनेश परदेशी (वैजापूर), शेख असीफ शेख रशीद (मालेगाव मध्य), शाहु खैरे (नाशीक मध्य), निर्मला गावीत (इगतपुरी), राजेंद्र गावीत (पालघर), मायकेल फुर्ताडो (वसई), शोएब खान (भिवंडी पश्‍चिम), श्रीमती प्रभात पाटील (ओवळा-माजीवाडा), नारायण पवार (ठाणे), शीतल म्हात्रे (दहीसर), सप्रा चरणसिंग (मुलुंड), राजेश शर्मा (जोगेश्‍वरी पूर्व), राजसंह धनंजय सिंग (दिंडोशी), भारत पारेख (चारकोप), अस्लम शेख (मालाड पूर्व), बलदेव खोसा (वर्सोवा), अशोक जाधव (अंधेरी पूर्व), सुरेश शेट्टी (अंधेरी पश्‍चिम),

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...