नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 2014 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आघाडीच्या पाचमधील पहिल्या चारही क्रमांकांवर उत्तीर्ण होत मुलींनीच बाजी मारली. ईरा सिंघल, रेणू राज, निधी गुप्ता आणि वंदना राव यांनी अनुक्रमे पहिले चारही क्रमांक पटकाविले आहेत. तर, बिहारच्या सुहर्ष भगत या उमेदवाराने पाचवा क्रमांक मिळवत मुलांमध्ये पहिला येण्याचा मान मिळविला. अबोली नरवणे ही महाराष्ट्रातून प्रथम आली आहे. यूपीएससीच्या पहिल्या शंभर जणांच्या यादीत ती 78 व्या क्रमांकावर आहे. अबोली एम. ए. इंग्रजी असून मागील वर्षी तिची आयआरएससाठी निवड झाली होती. यंदा मुख्य परीक्षेसाठी तिने राज्यशास्त्र हा विषय घेतला हाेता
. शारीरिकदृष्ट्या 60 टक्के अपंग असलेली इरा सिंघल देशात पहिली आली. रेणू राजने पहिल्याच प्रयत्नात दुसरा क्रमांक पटकावला. निधी गुप्ता तिसऱ्या तर वंदना राव चौथ्या क्रमांकावर आहेत. सुहर्ष भगत हा पाचव्या क्रमांकावर आहे. तर सहाव्या क्रमांकावरही तरुणीच आहे. म्हणजेच टॉप-10 मध्ये 5लेकीच! यापूर्वी 2013मध्ये टॉप-5 मध्ये भारती दीक्षित ही एकमेव मुलगी होती. यूपीएससीने पहिल्यादांच मुलाखतीनंतर चौथ्याच दिवशी परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत
.एकूण 1236 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवेच्या “ए‘ तसेच “बी‘ दर्जाच्या वेगवेगळ्या पदांवर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 590 सर्वसाधारण, 354 ओबीसी, 194 एससी, 98 एसटी वर्गातील आहेत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी 180 जण आयएएस, 32 जण आयएफएस आणि 150 जण आयपीएससाठी पात्र ठरले आहेत. तर, 710 उमेदवार अ दर्जाच्या आणि 292 उमेदवारांची ब दर्जाच्या पदांसाठी निवड करण्यात आली आहे. 254 उमेदवारांना राखीव यादीत ठेवले जाईल.