भक्तांसाठी वैद्यकीय शिबिरे उभारून मुकुल माधव फाउंडेशन (MMF) करत आहे मदत
पुणे-– फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही पीव्हीसी पाइप्स आणि फिटिंग्जसाठीची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी आहे. कंपनीने २०२४ च्या पंढरपूर वारी यात्रेत आपला सहभाग कायम ठेवण्याची अभिमानाने घोषणा केली असून, 25 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला कंपनीने कायम पाठिंबा दिला आहे.
पंढरपूर वारीला ८०० वर्ष जुनी परंपरा आहे. लाखो भाविक पंढरपूरच्या विठोबा मंदिरात पायी २१ दिवसांची यात्रा करतात. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी चालू असलेल्या संकल्पाचा एक भाग म्हणून, फिनोलेक्सने २०२४ च्या वारी यात्रेसाठी सर्वसमावेशक सहायक कार्यक्रम आखला. फिनोलेक्सने वारकऱ्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासादरम्यान यात्रेकरूंच्या सोईत वाढ करण्यासाठी आवश्यक वस्तू पुरविल्या. यामध्ये वैयक्तिक सामान वाहून नेण्यासाठी मोठ्या उपयुक्त पिशव्या, अनपेक्षित हवामानापासून संरक्षण करण्यासाठी पोंचो आणि भक्तीमार्गात मदत करण्यासाठी हरिपाठ पुस्तिका यांचा समावेश होता. या भव्य सोहळ्याच्या व्यवस्थापनात कायद्याच्या अंमलबजावणीची महत्त्वाची भूमिका ओळखून कंपनीने कार्यक्रमाची देखरेख करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना रेनकोटचे वाटपही केले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या यात्रेदरम्यान आरोग्यसेवेला प्राधान्य होते. यावर उपाय म्हणून फिनोलेक्सची सीएसआर शाखा, मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ)ने यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाणी अनेक वैद्यकीय शिबिरे उभारली. या शिबिरांमध्ये वारकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात आरोग्याची काळजी घेऊन आवश्यक वैद्यकीय साहाय्य देण्यात आले.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.चे विक्री आणि विपणन अध्यक्ष श्री. प्रदीप शास्त्री वेदुला म्हणाले, “पंढरपूर वारीतील आमचा सहभाग हा फिनोलेक्सच्या महाराष्ट्रातील कृषी समुदायाशी असलेल्या नात्याचा पुरावा आहे. २५ वर्षांहून अधिक काळ आम्हाला या सोहळ्याला पाठिंबा देण्याचा मान मिळाला आहे. ८०० वर्षांची परंपरा जी लाखो लोकांना भक्ती आणि एकतेच्या भावनेने एकत्र आणते, ती आम्हाला ‘वारकरी सेवे’मध्ये सहभागी करून घेण्यास अनुमती देते, जी आमच्यासाठी सामाजिक कार्य आणि विठ्ठलाला वंदन करण्यासारखीच आहे. आम्हाला अशा परंपरेत सहभागी होण्याची ही संधी आहे, जी सर्व सामाजिक स्तरातील लोकांना एकत्र आणते. आम्ही ज्या लोकांची सेवा करतो, त्यांच्याशी असलेली आमची वचनबद्धता ही वारीमधील आमच्या सहभागातून दिसून येते.”
फिनोलेक्सचा या उपक्रमातून सेवा देत असतानाच, परंपरा टिकवून ठेवण्याचा संकल्प प्रतिबिंबित होतो. महाराष्ट्रात खोलवर रुजलेली कंपनी आणि कृषी क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी म्हणून फिनोलेक्सने वारीला आपले ग्राहक बंध मजबूत करण्याची आणि या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमात अर्थपूर्ण योगदान देण्याची संधी म्हणून पाहिले आहे.