मुंबई – धनगराच्या वेशात आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अन्य विरोधकांनी धनगर आरक्षण प्रकरणी विधानभवनात जोरदार निदर्शने केली
यासंदर्भात अजित पवार म्हणाले ,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पहिल्या कॅबिनेटमधे धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आजवर ते पाळले नाही. या सरकारने धनगर समाजाला केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. धनगरांची मतं घेऊन मुख्यमंत्री झाले, सत्तेवर आले पण आता धनगर समाजालाच फसवण्याचे काम ते करत आहेत.
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज आम्ही विधान भवनात जोरदार निदर्शने केली. धनगर समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळायलाच हवे!

