नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती उतरत असल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात नव्याने कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर २.४२ रुपयांनी, तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात लागू होईल.
मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोल आता ६६.३६ रुपयांऐवजी ६३.९० रुपयांना मिळेल. डिझेलसाठी ५५.४७ ऐवजी ५२.९९ रुपये द्यावे लागतील. याआधी १ आणि १५ जानेवारी रोजी पेट्रोल, डिझेलची दरकपात झाली होती.