रिक्त जागा ऑफ लाईन भरण्यास मान्यता देणार का याची पालकांमध्ये उत्सुकता.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश नाकारणाऱ्या शाळांविषयी अहवाल आल्यास कारवाई करणार.–.रामचंद्र जाधव यांची ग्वाही.
पुणे-
अकरावी च्या ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक विद्यार्थी विद्यार्थीनीना घरापासून लांबचे महाविद्यालय मिळाल्यामुळे ते व त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत,अनेकांना हा खर्च परवडणारा नाही,तर काहीना एवढ्या लांब जाताना सुरक्षिततेची काळजी वाटते.यामुळे अनेकांचे शिक्षण खंडित होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा चे शिष्टमंडळ भाजप चे पुणे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर,युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष गणेश घोष,युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे,विशाल पवार ,दीपक पोटे,प्रतुल जागडे, यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या कार्यालयात धडकले .लांबचे महाविद्यालय मिळालेल्यांसाठी गुणवत्तेनुसार ऑन लाईन फेरीस शिक्षण उपसंचालक ही अनुकूल असल्याचे चर्चेतून निष्पन्न झाले.मात्र यासाठी शासनाने परवानगी देणे गरजेचे असल्याने यासंदर्भात भाजयुमो ने विनोद् तावडे यांना निवेदन सादर केले आहे.
त्याच बरोबर अनेक महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त असून संबंधित महाविद्यालयांना या जागा ऑफ लाईन भरण्यास शासन मान्यता देणार का,याकडे ही पालकांचे लक्ष लागले आहे.
तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली किवा नर्सरी ला प्रवेश नाकारणार्या शाळांबद्दल तक्रारी आल्या व शिक्षण प्रमुख बी.के.दहिफळे यांनी अश्या शाळांबाबत चा अहवाल सादर केल्यास त्या शाळांविरुद्ध कारवाई करू असे ही श्री.जाधव यांनी स्पष्ट केले.