Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘कट्यार काळजात घुसली’ मधील खॉंसाहेबाची भूमिका हा माझ्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट – सचिन पिळगावकर

Date:

‘हा माझा मार्ग एकला’ म्हणत बालवयातच अभिनयाची कारकिर्द सुरू करणारे आणि पुढे अभिनय हाच आपला मार्ग बनवत त्यावरून चालत मराठीसोबतच हिंदी चित्रपटांच्या प्रांतातही मनसोक्त मुशाफिरी करणारे, अभिनयासोबतच निर्माते, दिग्दर्शक, संकलक, गायक ते अगदी संगीतकार अशा नानाविध क्षेत्रांवर यशाची ठसठशीत मोहोर उमटविणारे व्यक्तिमत्व/कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर.

1

आपल्या कारकिर्दीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर सचिनजी आजही त्याच जोमात आणि जोशात पुढे वाटचाल करीत आहेत. या वाटचालीत अनेक मैलांचे दगड निर्माण केल्यानंतर आता ते सज्ज झाले आहेत एका नव्या दमदार भूमिकेसाठी. एक अशी भूमिका जी मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड म्हणून ओळखली जाते. मराठी नाट्यसंगीतामध्ये अजरामर असलेलं नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली ज्यातील खॉंसाहेब हे पात्र आपल्या अभिनयाने आणि सदाबहार गायकीने रंगवलं होतं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांनी. याच नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्यामध्ये खॉंसाहेबांची अजरामर अशी भूमिका रंगवणार आहेत अभिनेते सचिन पिळगावकर. त्यांचा या चित्रपटातील हा ‘लूक’ नुकताच एका विशेष कार्यक्रमांत सादर करण्यात आला यावेळी दिग्दर्शक सुबोध भावे, एस्सेल व्हिजनचे नितीन केणी आणि निखिल साने यांच्यासह सचिनजींचे कुटुंबियही उपस्थित होते.

2

या वेळी खॉंसाहेबांच्या भूमिकेविषयी बोलताना सचिनजी म्हणाले की, “या भूमिकेसाठी सुबोध भावे यांनी माझ्या नावाचा विचार केला हा माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. परंतू सुबोधने हा विश्वास दाखवला आणि विक्रम गायकवाड यांच्या रंगभूषेच्या जादूई प्रतिभेने हा विश्वास अजूनच दृढ झाला. या भूमिकेद्वारे मी माझ्या ५२ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच अशी नकारात्मक छटा असलेली भूमिका करत आहे.

4 5

कारकिर्दीच्या या टप्यावर ही भूमिका मिळणं हे मी एक अतिशय महत्त्वाचं वळण समजतो. ही भूमिका दोन गोष्टींसाठी माझ्या अतिशय जवळची आहे एक म्हणजे संगीतावरचं प्रेम आणि दुसरी म्हणजे ऊर्दू भाषेची गोडी. खॉंसाहेब हे पात्र बरेली शहरातलं असल्यामुळे या चित्रपटात मी पूर्णपणे केवळ ऊर्दू भाषा बोललो आहे. प्रभावी संवाद आणि सोबतीला अर्थूपर्ण शायरी याने ही व्यक्तिरेखा सजलेली आहे. भव्यतेचा अनुभव देणारी निर्मितीमुल्ये आणि लेखक प्रकाश कपाडिया, छायालेखक सुधीर पलसाने, अभिनेत्री साक्षी तन्वर, गायक-संगीतकार आणि आता अभिनेतेही शंकर महादेवन यांसारख्या हिंदीतील दिग्गज सहका-यांमुळे हा चित्रपट केवळ मराठीच नाही तर तो ख-या अर्थाने भारतीय चित्रपट झाला आहे असं मी मानतो” अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सचिनजींच्या पत्नी सुप्रिया, मुलगी श्रिया आणि त्यांच्या आईनेही या भूमिकेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दोन संगीत घराण्यातील संघर्षावर कट्यार काळजात घुसलीचं कथासूत्र बेतलेलं आहे. एखादी कला सादर करताना ती कला महत्त्वाची की सादर करणारा कलाकार हे या संघर्षाचं सूत्र. विश्रामपूरचे महाराज विष्णूराज यांच्या दरबारातील गायकाचं पद हे अतिशय मानाचं. शास्त्रीय गायक पंडित भानुशंकर यांनी आपल्या गायकीने राजाचं मन जिंकून राजगायक होण्याचा बहुमान मिळवलाय. परंतू हे राजगायक पद मिळवण्यासाठी एका बाजूने खॉंसाहेबांचाही आटोकाट प्रयत्न सुरू आहे. पुढे अशा काही घटना घडतात की हे पद खॉंसाहेब मिळवतात आणि त्यासोबतच त्यांच्यावर जबाबदारी येते ती स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची आणि हे पद टिकवून ठेवण्याची. पण असं म्हणतात की एखाद्याला यश मिळतं तेव्हा त्यासोबतीने येतो तो अहंकार आणि या अहंकारातून जन्माला येतो एक नवा संघर्ष. हा संघर्ष आपल्या अभिनयातून अतिशय प्रभावीपणे मांडला होता पंडित वसंतराव देशपांडे यांनी. रंगभूमीवर एक नवा इतिहास रचणारी ही भूमिका आता रूपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे सचिन पिळगावकर यांच्या चतुरस्र अभिनयाच्या माध्यमातून.

3

 ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध अभिनते सुबोध भावे हे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. चित्रपटात सचिनजीसोबतच अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात शंकर महादेवन यांच्यावर चित्रीत झालेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं सूर निरागस हो हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालेलं आहे. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक सोनु निगम, विशाल दादलानी, श्रेया घोषालपासून ते लतादिदी पर्यंत सर्वांनी या गाण्याची स्तुती करून ट्विटरवर याचा व्हिडीओ शेअर केला होता. तर हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आणि सुप्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही या गाण्याला पसंतीची पावती देत हा व्हिडीओ शेअर करून शंकरजींना शुभेच्छा दिल्या होत्या. यामुळे मराठी रसिकांसोबतच हिंदी जगतातही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

यावर्षी ‘लोकमान्य – एक युगपुरूष’, ‘टाईमपास २’, ‘डबलसीट’ सारखे सुपरहिट चित्रपट आणि ‘किल्ला’सारखी आशयघन कलाकृती देणा-या एस्सेल व्हिजनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् ने चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट सिनेरसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खुनातील आरोपी उद्धव उर्फ उद्ध्या कांबळेला सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे – २०१६ साली झालेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या...

ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा :उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १५ जुलै २०२५ : ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा...