मुख्यमंत्री भाषणाला उभे रहाताच’त्या’ महिलेने केले धाडस ..(व्हिडीओ)
पुणे- पुण्याच्या सभेत मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले आणि … ती महिला पुढे उभी राहिली ..चक्क हातात ..भोंगा ..घेवून .. म्हणाली मुख्यमंत्री साहेब ..मला तुमच्या शी बोलायचं … मुख्यमंत्री म्हणाले जरूर ..पण हि पद्धत योग्य नाही …. पुढे भाषण सुरु झाल्यावर पुण्याच्या पोलिसांनी या महिलेला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच ..पुन्हा मुख्यमंत्री म्हणाले … पोलीस तुम्ही बाजूला व्हा ….. अखेर भाषण संपताना .. जय महाराष्ट्र ..म्हणताच ..मुख्यमंत्री ..म्हणाले ताई ,तुम्ही मागे या ……
पहा नेमके काय झाले कोण होती ती महिला ……
आमहाला मिळालेल्या माहितीनुसार हि महिला साधीसुधी सामान्य महिला नसून ,ती एका माजी आमदाराची सून असल्याचे समजले ,आणि या महिलेने आपल्या सासर च्या मंडळी वर छळवणूक प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याचे समजले .काही दिवसांपूर्वीची हि घटना ..बहुधा यासंदर्भात या महिलेने मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिले असावे .. नेमके यात घडले काय ? हे अधिकृतरीत्या समजू शकलेले नाही .
पुण्यात आज चंदननगर येथे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारा साठी हि सभा आयोजित करण्यात आली होती .