पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019
पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द एस.ए.पूनावाला मिलियन या शर्यतीत सुलतान सुलेमान या घोड्याने 1600मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द एस.ए.पूनावाला मिलियन या महत्वाच्या लढतीत दिनशा पी. श्रॉफ, मुनची पी. श्रॉफ, अबन एन.चॊथीया आणि सलीम फेजलभॉय यांच्या मालकीच्या सुलतान सुलेमान या घोड्याने 1मिनिट 38सेकंद व 584मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा ए संदेश हा जॉकी होता, तर अल्ताफ हुसेन ट्रेनर होता.
सविस्तर निकाल:
द एस.ए.पूनावाला मिलियन
विजेता: सुलतान सुलेमान, उपविजेता: त्रूवली