नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रबळ उमेदवारांची आणि दुर्बल उमेदवारांची माहिती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी जमविण्यास प्रारंभ केला असून पुण्याचे खासदार दुर्बल उमेदवार ठरतील असा अहवाल त्यांना मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे . मात्र याबाबत नितीन गडकरी यांच्याकडून ही शिरोळे यांच्याकार्याबाबतचे मत जाणून घेण्यात येणार आहे.यापार्श्वभूमीवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शिरोळे यांच्या ऐवजी नवा चेहरा शोधण्याची मोहीम हि आता राबविली जावू शकणार असल्याचे वृत्त आहे .
नुकत्याच झालेल्या काही राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच भाजपने राज्याराज्यातील लोकसभा सदस्यांचे कामकाज पत्रक तपासून घ्यायला सुरुवात केली .आणि आतापर्यंत ४५ टक्के काम पूर्णही झाल्याचा दावा करण्यात येतो आहे .
पुण्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सखोल कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता हि माहिती सूत्रांनी दिली . मेडिक्लेम विषयी पुण्यातील डॉक्टरांशी अनिल शिरोळे यांनी केलेल्या चर्चा निष्फळ ठरल्या . त्याचा परिणाम डॉक्टरांना फायदा होण्यात झाला मात्र रुग्णांना त्याची दुप्पट किंमत मोजावी लागते आहे .याबाबत मेडिक्लेम करणाऱ्या सर्व कंपन्या आणि आधिकारी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे . पाॅलीसिंची संख्या कमी होत आहे. नवीन पॉलिसि मिळणे दुरापास्त होत आहे .याशिवाय शिरोळे यांनी पीएमपीएमएल वर स्वतःच्या मुलाची निवड करूनही तेथील कामगार अत्र त्यांच्या कार्य्पाधातीवर नाराज आहेत . कोणाच्या अध्या मध्यात नसलेले शांत व्यक्तिमत्वाचे असले तरी एकंदरीत पाट्या टाकणारे खासदार अशी त्यांची प्रतिमा बनली आहे . कार्यकर्त्यांचा मोठा समूह अथवा नागरिकात स्वतःचे कर्तुत्व ते सिद्ध करू शकलेले नाहीत . असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे .
दरम्यान काल अनिल शिरोळे आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी दुपारी पुण्यात राजकारणावर सुमारे दीड तास खलबते केल्याचे समजले आहे .