सततची पाठदुखी? दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा
पुणे- पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून . आकड्यांनुसार ६ मधील १ पुरुष प्रोस्टेट कॅन्सरग्रस्त आहे. गंभीर आजारांवर मात करण्यासाठी त्यावर लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. ६ एप्रिल २०१८ ते १४ एप्रिल २०१८ ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
जवळपास 60 टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात, ८०% – ९०% संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्र ह्यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात जेव्हा उशीर झालेला असतो असे मत आयपीसीचे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. देशमुख हृषीकेश यांनी व्यक्त केले. प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी 120 पेक्षा अधिक शिबीरांच्या माध्यमातून ५०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे.
प्राथमिक लक्षणे:
• वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे
• कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो.
भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 50 वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. पूर्व निदान माध्यमातून प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे कळाले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयुएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोअप्सी समजली जाते. प्रॉस्टेट कॅन्सरच्या अचकू निदानासाठी
जवळपास12 ते 14 तुकडे टिश्यूजची अत्यंत पद्धतशीरपणे तपासणी करावी लागते. आणि एमआरआयद्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: 50 वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.
प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.
तारीख : ६ एप्रिल २०१८ ते १४ एप्रिल २०१८
ठिकाण : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर, पुणे ग्राउंड फ्लोअर, कुमार – दि ओरायन, सेंट मिराज कॉलेजजवळ, डॉनबॉस्को युथ सेन्टरच्या विरुद्ध, कोरेगाव पार्क, पुणे
संपर्क : ७७९८५७७५६३ / ९७६६२२७७१२