आमची सोसायटी – अलंकार सोसायटी
साल १९७१ … एरंडवणे भागातील गणेशनगर ते कर्वेनगर या भागात जाण्यासाठी ओढ्याचा वापर करावा लागत असे . सर्वाधिक वेगाने विकसित झालेल्या कर्वेनगरमध्ये पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यानंतर या भागात जाण्या येण्याचा संपर्क तुटत होता. ह्या गोष्टीवर आज कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु १९७१ साला पर्यंत हेच इथले वास्तव होते .
ह्या भागातील सर्वात जुन्या १९६३ साली स्थापन झालेल्या प्रतिथयश अश्या आमच्या अलंकार सहकारी गृह रचना संस्थेने स्वतःच्या मालकीच्या जागेतूनच नव्हेतर स्वखर्चाने गणेशनगर — ते कर्वेनगर भागास जोडणारा पूल १९७१ साली बांधला व त्या नंतर कर्वेनगरचा खऱ्या अर्थाने विकास सुरु झाला. नुसता पूल बांधला असे नव्हेतर स्वतःच्या मोकळ्या जागेतून अन्य सोसाट्यांना जाण्या साठी रास्ता उपलब्ध करून दिला. कर्वेनगर भागाच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकीतून अलंकार पोलीस चौकी साठी सुद्धा सोसायटीच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील काही जागा दिली .
आज हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री दत्त मंदिराची उभारणी सुद्धा अलंकारसोसाटीने स्वतःच्या जागेत केली . परंतु आमच्या सोसायटीला एवढे दिवस स्वतःचे क्लब हाऊस नव्हते, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष श्री खाडिलकर यांनी दिली.
“अलंकार सोसायटी च्या क्लब हाऊसचा भूमिपूजन समारंभ संपन्न “
——————————————————————
२४ जानेवारी २०१९ रोजी चतुर्थीच्या शुभदिनी अलंकार सोसायटीच्या क्लब हाऊसचे भूमिपूजन नगरसेविका सौ मंजुश्रीताई संदीप खर्डेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . या कामात असणारे असंख्य अडथळे नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर यांनी दूर केले व त्यामुळेच हे क्लब हाऊस पूर्णत्वास जात आहे .
सोसाटीचे अध्यक्ष श्री सुधीर खाडिलकर यांनी सभासदांना व उपस्थितांना क्लब हाऊस ची माहिती दिली. क्लब हाऊसचे वास्तुविशारद श्री प्रकाश कुलकर्णी व भा ज प चे शहर उपाध्यक्ष श्री संदीप खर्डेकर यांचा त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व मदतीबद्दल सोसाटीचे अध्यक्ष व सचिव सौ रजनी जोशीराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सोसाटीचे संस्थापक सदस्य श्री अरविंद जोशीराव प्रसिद्ध वास्तुविशारद श्री बाळासाहेब अधिकारी, श्री पारसनीस, तसेच प्रसिद्ध ज्वेलर्स अक्षय गाडगीळ,श्री योगेश कुलकर्णी व संस्थेचे सभासद मोट्या संख्येने उपस्थित होते . संस्थेच्या सचिव सौ रजनी जोशीराव यांनी आभार प्रदर्शन केले .