पुणे-एकीकडे दिल्लीत पुण्याच्या उमेदवारीबाबत काकडे यांच्या नावावर चर्चा होत असताना ,दुसरीकडे उद्या दुपारी पुण्यात खासदार संजय काकडे यांच्या स्वागताची तयारी कॉंग्रेस मध्ये सुरु असताना आज सायंकाळी काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आणि काकडे भाजप मध्ये राहणार कि कॉंग्रेस मध्ये जाणार या संदर्भात चर्चेला उत आला .एवढेच नव्हे तर संभाजी ब्रिगेड ने हि काकडे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली .
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी पूर्ण होताच, भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज सायंकाळी संजय काकडे, सुभाष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झाली .
खासदार काकडे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी प्रचंड मेहनत घेतली होती. भाजपचे नगरसेवक मोठया प्रमाणावर निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासुन त्यांचा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून सन्मान राखला जात नव्हता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देखील दिली होती. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.आणि कॉंग्रेस मधूनच लोकसभा लढविण्याच्या मार्गावर ते राहिले यानंतर आज संजय काकडे यांची मनधरणी करण्यासाठी सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज या तिघांमध्ये वर्षा बंगल्यावर चर्चा झाली .
एकंदरीत पुण्याच्या लोकसभेचे राजकारण कॉंग्रेस सह भाजप मध्ये हि काकडे यांच्याभवती फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे . त्यात आता संभाजी ब्रिगेड ने देखील त्यांना उमेदवारी देण्याची तयारी जाहीर केली .शरद पवार यांच्या राजकीय चाणक्यनीती मध्ये काकडे यांची फरफट होते आहे कि काय ? असा प्रश्न या पार्श्वभूमीवर सामिक्षकांमध्ये उपस्थित होत होता . एकीकडे मी माढा लढविणार नाही म्हणणारे शरद पवार पुण्यातून स्वतः लढू इच्छितात कि काय ? काकडे यांना बारामती ची ऑफर देवून भाजपने त्यांना बळी चा बकरा बनविण्याचे ठरविले काय ? अशा विविध प्रश्नांवर चर्चा झडत होती .पण प्रत्यक्षात पुण्याच्या राजकारणात पुढे काय होणार आहे ते येत्या थोड्याच दिवसात स्पष्ट हि होणारच आहे .