पुणे-लोकसभेचे इच्छुक उमेदवार आणि राज्यसभेचे विद्यमान सदस्य संजय काकडे यांनी आपल्या भेटीगाठीची मोहीम अधिक तीव्र केल्याने लोकसभेच्या चर्चेच्या वर्तुळात मोठा राजकीय धुराळा उडतो आहे .
पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. दिवंगत माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, माजी उपमहापौर मुकारी अलगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
काल खासदार संजय काकडे यांनी पुणे कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल येथे किरकोळ व्यापारी व व्यावसायिकांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांचे प्रश्न व त्यांच्यासमोरील आव्हाने, समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि आपण स्वत: व्यावसायिक असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी समजू शकतो. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव त्यांच्यासोबत असेल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी माणिक भंडारी, भारतकुमार वर्मा, अनिल रणधीर, वसिम शेख, विजय भोसले, रवी जावळे मनीष साळुंखे, संदीप कांबळे, राजू परदेशी, सय्यद जाफर इराणी आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय नगरसेवक सुनील टिंगरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी लोकसभा निवडणुकीबरोबरच इतर सामाजिक विषयांवर त्यांनी चर्चा केली . याप्रसंगी हनिफ शेख, माजी नगरसेवक इस्माईल भाई, अरुण भालेराव, निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार बापुसाहेब पठारे यांचीही त्यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. यावेळी नगरसेवक राहुल भंडारे, अमित जाधव, स्वप्नील वाखरे, संतोष कुटे, धनंजय जाधव, राजेंद्र पठारे, शिवा हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेविका उषाताई कळमकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. याप्रसंगी ज्ञानेश्वर कळमकर, प्रशांत कळमकर, नगरसेवक राहुल भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
वडगावशेरी मतदार संघातील नारायण गलांडे यांची त्यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. याप्रसंगी नगरसेवक व क्रीडा समितीचे अध्यक्ष राहुल भंडारे, रमेश गलांडे, श्यामराव गलांडे, ज्ञानेश्वर देवकर, योगेश गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.