पुणे-कॉंग्रेस पक्ष ज्याला पुण्यातून उमेदवारी देईल त्याचे काम राष्ट्रवादी करेल ,उद्या कॉंग्रेसने संजय काकडे यांना दिली तरी राष्ट्रवादी त्यांचे काम करेल अशी ग्वाही आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली . खा. संजय काकडे यांच्या भेटीनंतर ते माध्यमांनी वचारले असता त्यावर बोलत होते.
काकडे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपने इतर नेत्यांचीच नावे चर्चेत आणल्याने काकडेंनी थेट आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आज पुण्यात अजित पवार यांची भेट घेऊन आपली मोर्चेबांधणी केली.
काॅंग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल त्याला राष्ट्रवादी काॅंग्रेस मनापासून मदत करेल, असे अजित पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. काकडे भाजपवर नाराज असल्याने तुमची भेट झाली का, या प्रश्नावर काकडेंनी माझ्याशी बोलताना तसे सांगितलेले नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याची माझी माहिती नाही. ते भाजपचे केवळ सहयोगी सदस्य आहेत. भाजपचे खासदार नसल्याने अपक्ष खासदार ते कोणालाही भेटू शकतात.